भाजपाच्या महेश सारंग यांचा उमेदवारी अर्ज दाखल
कणकवली
सिंधुदुर्ग बँकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या दुसऱ्या दिवशी भाजपा कडून दुग्ध, मत्स्य संस्था मतदारसंघातून महेश सारंग यांनी आज मंगळवारी नामनिर्देशनपत्र दाखल केले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सर्वप्रथम उमेदवारी दाखल करत भाजपाने या निवडणुकीत आघाडी घेतली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी वंदना खरमाळे यांच्याकडे श्री सारंग यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. यावेळी त्यांच्या सोबत भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी नगरसेवक बंडू गांगण, आदी उपस्थित होते.