*चावडी वाचन*
*लेख सादर: अहमद मुंडे*
लहान लहान वाड्या वस्त्या गतकाळात होत्या. लोक अडाणी अशिक्षित होतें प्रत्येक गावात शिकलेला एक व्यक्ति असायचा तोंच पेपर. वतृमानपत्र. वाचून कोठे काय झाले काय होणार आहे. पाउस किती आणि कोठे पडणार. देशात कोणत्या मालाचे काय दर झाले याची माहिती एक व्यक्ती चावडीवर गोळा झालेल्या लोकांना वाचून दाखविले जाते. आपल्या गावात नविन जुन काय घडलं गावाच्या विकासासाठी काय आवश्यक आहे. आपल्या गावातील जत्रा यात्रा कशी आणि कोणत्या प्रकारे पार पाडावी. याचा लेखाजोखा चावडी वाचन करून कळविला जात असे.
आज या चावडीचे रुपांतर ग्रामपंचायत चार भिंतींच्या आत झाले. निवडणूकीच्या नावाखाली गावातील लोकांच्या मनाला राजकीय सत्तेचा सुरुंग लावला आणि लोकांचे विभाजन मतांचे मनाचे विभाजन झाले. गावांत राजकारणा सारखे गजकर्ण आले आणि सर्व जनमत वेगळ झालं. ज्याची सत्ता त्याचेच गावात चालेल असं समिकरण समोर आले. कोणाचा कोणी विचार घेत नाही विरोधी यांना ग्रामसभेत बोलण्याचा अधिकार नाही. ग्रामसभेत आपल्या बाजूने बोलणारे लोक बोलाविले जातात. आज ग्रामसभा चार भिंतींच्या आत न घेता उघड्यावर म्हणजे चावडी वाचन करून जनतेला सहभागी होण्यासाठी पत्र व्यवहार करून मगच ती खरोखरच ग्रामसभा चावडी वाचन होईल
गावातील प्रत्येक नागरिकाला ग्रामसभेला हजर राहणे बोलावणे यासाठी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे त्यानुसार ग्रामसेवक. सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांचें कर्तव्य आहे. प्रत्येकाचे मत नोंदवा. प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे त्याला बोलण्याचा अधिकार आहे
चावडी वाचन करताना कृषी. पशुसंवर्धन वने शिक्षण वैद्यकीय सेवा सार्वजनिक सेवा इमारती दळणवळण पाटबंधारे उद्योग व्यवस्थापन सहकार स्वयंसंरक्षण ग्रामसरक्षण. अशा विविध विषयांचे चावडी वाचन म्हणजे ग्रामसभा होय.
बेकाराची संख्या? गावाची लोकसंख्या किती? वयोवृद्ध व्यक्ती महिला किती ? विधवा निवृत्तीवेतन पेन्शन धारक व्यक्ती किती ? गावात पाण्याचा स्त्रोत कोणता. ? गावात शालेय शिक्षण सुविधा काय आहे ? आशा सेविका, अंगणवाडी सेविका किती? गावात शालेय शिक्षण पोषण व्यवस्था केली आहे का? गावात किती मुल शालेय शिक्षण घेत आहेत? गावात वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध डॉक्टर,नर्स किती?औषधं साठा किती ? विविध लसीकरण सोय आहे का ? गावात दारु दुकान किती ? गावात हाॅटेल. पानपट्टी. किराणा दुकान. व इतर उधोगाची दुकान किती ? गावातील सामाजिक धार्मिक मंदिर संख्या किती ? स्मशानभूमी आहे का कोणत्या परिस्थितीत आहे ? गावात ग्रंथालय वाचनालय आहे का ? गावात कोरडवाहू. बागायती जिरायती क्षेत्र किती आहे ? गावात कोण कोणती मौसमी पिके घेतली जातात ? गावात हुतात्मा स्मारक. पुतळे. स्वागत कमानी संख्या किती ? गावात दुधाळ जनावरे किती ? गावात मोकाट जनावरे किती ? गावात गायरान मुलाणकी देवसकी. यांच्या अंतर्गत जमीन क्षेत्र किती ? गावात अपंग व्यक्तींना देण्यात येणारे अनुदान किती कोणत्या निकषांवर ? अस्पृश्यता निवारण केंद्र मानसिकता ? भ्रष्टाचार निर्मूलन समिती नेमली आहे का ?जुगारास अवैध धंदे याला बंधनं घातले आहे का ? निरर्थक वाद भांडणे यांना आळा कसा घातला जातो ? सार्वजनिक रस्ते. नाले. तलाव विहिरी. ठिकाणची जागा स्वच्छ आहे का ? कचरयाचे ढिग. माजलेले रान. काटेरी निवडुंग. आरोग्यास धोकादायक डबकी. खंदक. खड्डे. खाच खळगे. याची कशा पद्धतीने नियोजन केले जाते ? खेळांचे मैदान. सार्वजनिक उप वने. धर्मशाळा. गावात दिवा बतती उपयोजना कशी केली जाते ? गावात पतसंस्था आणि बहुउद्देशीय संस्था. बॅंक अशा आर्थिक विकास योजना आहेत कां ? गावात पहारा देखरेख करण्यासाठी काय उपाययोजना करण्यात आली आहे ? आग विझवने. आत्महत्या. खून मारामाऱ्या. अशा जीवीतास धोका व गावाच्या प्रतीषटेला धोका उत्पन्न करणार्या घटना कशा हाताळल्या जातात. ? सफाई कर्मचारी आहेत का ? गावात रेशन दुकान किती ? अंत्योदय अन्न योजना. ब गट. व केशरी शिधापत्रिका धारकांची. संख्या किती ? गावात डाक विभाग ऑफिस आहे का ? गावात पोलिस स्टेशन आहे का ? सरपंच उपसरपंच सदस्य कर्मचारी यांचें शासन निर्णयानुसार वेतन किती ? दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत १५ वया वित्त आयोगा नुसार येणारा निधी आणि त्याचा वापर याचा लेखी तपशील ठेवला आहे का ? गावाच्या विकासासाठी शासनाकडून देण्यात आलेला निधी किती त्याचा वापर केला असेल तर त्याचा लेखाजोखा ठेवला आहे का ? गावातील ग्रामसेवक तलाठी आपल्या मुख्यालयात रहाण्यास आहेत का ? गावात नविन जुनें खरेदी विक्री व्यवहार किती झाले त्याचे सातबारा फेरफार रजिस्टर नोंदणी वही ठेवली आहे का ? गावात पानपट्टी घरफाळा व इतर अन्य ग्रामपंचायत कर किती गोळा होतो त्याचा विनियोग कसा आणि कोठे केला जातो ? अशा विविध विषयांची विचारणा करण्याचा अधिकार सर्वसामान्यांना आहे. नागरिक यांना सुध्दा आहे कारणं सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामसेवक तलाठी. हे आपल्यासाठी शासनाने आपले सेवक म्हणून नेमले आहेत आपणांस लागणारे विविध योजनांसाठी विविध दाखले लागतात जर कोणताही अधिकारी व कर्मचारी आपणांस नाहक त्रास देत असेल किंवा पैशांची मागणी करत असेल तर आजच मा.जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करा.
आज जनतेच्या तोडाला पाने पुसण्याचा कार्यक्रम ग्रामसभेच्या माध्यमातून केला जात आहे आजच आपल्या गावातील ग्रामसभा चार भिंतींच्या आत न घेता चावडी वाचन सर्वांसमोर करण्याची मागणी करा त्याशिवाय सरपंच उपसरपंच सदस्य तलाठी ग्रामसेवक यांचें पितळ उघडे पडणार नाही. फक्त चहा आणि कॉफी लाडू खाण्यासाठी ग्रामसभेला जाऊ नका. आपलच पैसे आपल्या विकासाच्या योजना. शासन आपलच. मग आजच खुलं बोला कोणतेही राजकीय भय न ठेवता.
समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९