You are currently viewing प्रीति संगम

प्रीति संगम

जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक, कवी श्री अरविंदजी ढवळीकर यांची काव्यरचना

गांव मागे राहिले रे वाट माझी ही उद्या ची
कां परी छळते अजुन ही ओढ प्रीती संगमाची

नव्हतीच तेंव्हा जाग कसली होईल केंव्हा रात्र याची
वेळ ही आतां न उरली त्या स्मृती स्वीकारण्याची

होती कशी तीरा वरी त्या काय जादू रंगण्याची
लपवू कसा आजन्म मी उसनी ऊधारी त्या क्षणांची

गेले कुणी देवून कांहीं मैत्री कशी जुळली कुणाची
सांगणे वा विसरणे ही होईल बदनामी ऋणांची

ठाऊक आहे संवय वेडी हंसुन सारे टाळण्याची
शपथ ही आहे तुला ग मोकळ्या माझ्या मनाची

साडी अबोली वेणी अबोली बोली अबोली समजण्याची
भेट पहिल्या भेटीतली ती साक्ष आहे संगमाची

होईल जेंव्हा वेळ सखये हा किनारा सोडण्याची
वचन घे विसरेन मी ही संवय माझी विसरण्याची

अरविंद

प्रतिक्रिया व्यक्त करा