You are currently viewing ओमिक्रॉन या नव्या स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी जास्त खबरदारी घ्यावी

ओमिक्रॉन या नव्या स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी जास्त खबरदारी घ्यावी

 जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्गनगरी

कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ या नव्या स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी जास्त खबरदारी घ्यावी. नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी केले.

            दक्षिण आफ्रिकेमध्ये सापडलेला या नव्या स्ट्रेनमुळे जास्त खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी गर्दी करणे टाळावे. तसेच कोविडबाबत दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे असेही आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

            मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांच्यासोबत कोविडच्या उपाययोजनांबाबत व्हीडिओ कॉन्फरन्सींगद्वारे संवाद साधला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे डिन श्री. मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी संदेश कांबळे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा