सावंतवाडी
नाणोस येथील सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेना शाखाप्रमुख समीर नाणोसकर यांचे आज अपघाती निधन झाले. गोवा-अंजूना येथे पेंटिंगचे काम करत असताना ते खाली कोसळून गंभीर जखमी झाले होते. दरम्यान त्यांना तात्काळ बांबुळी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.
त्यांच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ, एक बहीण, असा परिवार आहे. युवासेना उपजिल्हाधिकारी सागर नाणोसकर यांचे ते चुलत बंधू होते. दरम्यान त्यांच्या अकाली निधनामुळे नाणोस गावासह त्यांच्या मित्र परिवारामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.