ऑगस्ट 2021 मध्ये महाराष्ट्र राज्य शैक्षणिक प्रशिक्षण परिषद पुणे यांचेमार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेत केंद्रशाळा शेर्पेच्या विद्यार्थ्यांनी घवघवित यश संपादन केले . ४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते . ४ ही विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा चांगल्या गुणांनी पास झालेले आहेत .अथर्व सत्यविजय सावंत – 256 ,सिद्धी संजय गर्जे -218 , चिन्मय दशरथ शिंगारे – 214 ,जय सुभाष देवधर – 146 याप्रमाणे 300 गुणांपैकी गुण मिळवून विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा पात्र झालेले आहेत .या विद्यार्थ्यांना अमोल भंडारी ,राजू गर्जे ,दशरथ शिंगारे यांचे मार्गदर्शन लाभले .सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन शाळेचे मुख्याध्यापक दशरथ शिंगारे ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विलास पांचाळ, शिक्षक-पालक संघ उपाध्यक्ष विनोद शेलार ,व शेर्पे गावच्या सरपंच निशा गुरव , उपसरपंच अरुण ब्रह्मदंडे ,सुहास पातडे विस्तार अधिकारी प्रभाग तळेरे , सद्गुरु कुबल केंद्रप्रमुख केंद्र शाळा शेर्पे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे ,शाळेचे मुख्याध्यापक व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले .
केंद्रशाळा शेर्पेचे शिष्यवृत्ती परीक्षे मध्ये सुयश
- Post published:नोव्हेंबर 27, 2021
- Post category:बातम्या / बांदा
- Post comments:0 Comments