संवाद मीडियाच्या पहिल्या दिवाळी अंकावर जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सदस्या विविध पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ लेखिका, कवयित्री प्रा.सौ.सुमती पाटील यांचा मन प्रसन्न करून उर्मी वाढविणारा अभिप्राय…
॥शुभं भवतु ॥
“ परंपरेच्या मुशीत घडतो संस्कृतीचा दागिना”
वाह … वा.. या एकाच वाक्यात संस्कृतीचे सार सांगणारे
संपादकीय वाचून हा आपला पहिलाच अंक आहे …खरे
वाटू नये,इतके अंकाचा सार सांगणारे आपले संपादकीय
आहे .पहिलाच अंक इतका छान तर .. भविष्य उज्वल असणारंच यात कसली शंका …?संपादकीय मधील लेखकांच्या कृतीचा परिचय वाचून तर .. मन खूप सुखावले.
लेखकाच्या कृतीचा असा मनमुक्त गौरव क्वचितच केला
जातो कारण त्या साठी लागते साहित्याचे भान व लेखकाप्रती
कृतज्ञता … तरच असा सन्मानाने… प्रास्ताविकात उल्लेख येऊ
शकतो. हे संवेदनशील मन जपा सर .. याचे खूप फायदे
असतात . दोन्ही हातांनी मुक्त हस्ते आपण कुणाला काही देत
असू तर …(भले ते शब्द का असेनात…अहो हे शब्दच तर
मने जोडतात आणि तोडतात ही …)मग माणसे जोडणे फार
सोपे असते. आणि हो.. माणसेच जोडली नाही तर …?
जीवनाची बेरीज होण्या ऐवजी वजाबाकीच होणार की ..?
मग आपण किती ही पैसा कमवला तरी तो निरर्थक ठरतो.
बघता क्षणी मन प्रसन्न करणारे मुखपृष्ठ आणि साहित्यातील
दिग्गजांच्या लेखनाचा चविष्ट फराळ करून मन तृप्त न झाले
तरच आश्चर्य ….!
“संतांची सामाजिक फलश्रृती ते विठ्ठल विठ्ठल”..खरोखर
साहित्यिक मेजवानी म्हणतात ती हीच याची खात्री पटते.विषयांचे वैविध्यही उत्तमच..! सजग पालक, झोका, करोना,मनातलं माकड .. किती वेगवेगळे विषय आहेत .
काव्यांजली ही चोखंदळ आहे. “तुला आठवतं का ग”
“सुंदर सावंतवाडी”भेट पाहिजे बस …” मस्त मस्त कविता ….!
शिवाय “अलक” आहेतच.. खरे तर अलक हा माझा प्रांत नाही. तरी ही छानच आहेत .खरोखर संग्रही ठेवावा .. अधून मधून वाचावा असाच आपला अंक आहे ..
सर .. तुमचे खूप खूप अभिनंदन… ! तुम्ही स्वत: उत्तम व
संवेदनशील लेखक आहात हे वेळोवेळी तुमच्या कवितांमधून
चांगलेच लक्षात राहिले आहे .
तुमच्या भविष्यातील वाटचालीसाठी .. सर .., तुम्हाला
खूप खूप शुभेच्छा व वडिलकीच्या नात्याने आशीर्वाद ही देते.
All The Best Sir …..
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि.२६ नोव्हेंबर २०२१
वेळ : सकाळी १०:२४