You are currently viewing बाप

बाप

आम्ही बालकवी, सिंधुदुर्ग संस्थेचे संस्थापक, कवी श्री राजेंद्र गोसावी यांची काव्यरचना

ओढी संसाराचा गाढा
भूक लपवी तहान
असा माझा बाप होता
गोष्टी सांगायचा छान

सदा उघडे शरीर
सर्व घामाने निथळे
तंप्त सुर्य डोक्यावर
कोठे सावली ना मिळे

झिझे चंदनासम तो
त्याचे आयुष्य जुगार
नेई नाव पैलतिरी
असा तो तारणहार

काम करूनी परते
मुख हासरे ठेवूनी
घास भरवी लेकास
भुख थोडीशी दाबोनी

सदा कुटुंबाचा ध्यास
करी अहोरात्र काम
कष्ट करी वारंवार
माय पित्याचा तो राम

आली वादळे , संकटे
तरी खंबीर तो बाप
वार झेली अंगावर
दुःख ओलांडे ना माप

होता काळजाने उंच
बाप आभाळा एवढा
सारे आकाश ठेगंणे
प्रेम मुठभर वाढा

गाथा वर्णावी बापाची
शब्द कोठोनी आणावे
असा फाटका फकीर
देव तेथेची पाहावे

राजेंद्र गोसावी .
आम्ही बालकवी संस्था , सिंधुदुर्ग
९४०५७७८७२६

प्रतिक्रिया व्यक्त करा