You are currently viewing मालोंड वासियांची मागणी आ. वैभव नाईक यांनी केली पूर्ण

मालोंड वासियांची मागणी आ. वैभव नाईक यांनी केली पूर्ण

*मालोंड गडनदी तर जेटीसाठी २५ लाख निधी मंजूर*

*खा. विनायक राऊत, आ.वैभव नाईक यांच्या हस्ते झाले भूमिपूजन*

मालवण :

गेली अनेक वर्षे सातत्याने मागणी होत असलेल्या मालोंड गडनदी तर जेटीचा प्रश्न मार्गी लागला आहे. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून या जेटीसाठी महाराष्ट्र सागरी मंडळ अंतर्गत २५ लाख निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याचबरोबर विरण ते मालोंड हा रस्ता चार किलोमीटरचा असून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत ३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आज या दोन्ही कामांची भूमिपूजने खा. विनायक राऊत, आ.वैभव नाईक यांच्या हस्ते पार पडली.

 

मालोंड गडनदी तर जेटीमुळे मालडी, विरण, मालोंड, मसदे, आडवली, चुनवरे, श्रावण, पळसंब या गावांना याचा लाभ होणार आहे. मालोंड येथील नागरिकांना मालडी,आडवली गावांमध्ये बोटीद्वारे प्रवासाचा मार्ग सुखकर होणार आहे. तसेच पर्यटन व रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होणार आहे.

जेटी होण्यासाठी तरुण उत्कर्ष मंडळ मुंबईचे अध्यक्ष जयवंत पांजरी, सचिव अनिल परब, कमलाकर सुर्वे, बाळा सुर्वे, फतू घाडीगावकर, गोविंद वाडकर, बाळा परब, सुभाष परब, पांडुरंग तांडेल, शाखा प्रमुख समीर घाडीगावकर, सुरभा पुजारे, बाळा पारकर, संतोष घाडीगावकर, नवनाथ घाडीगावकर यांनी आ.वैभव नाईक यांच्याकडे पाठपुरावा केला होता. महाराष्ट्र सागरी मंडळाचे सचिन गायकवाड यांनीही यासाठी सहकार्य केले.

मालोंड गावाला भरघोस निधी देत प्रमुख समस्या मार्गी लावल्याबद्दल तरुण उत्कर्ष मंडळ मुंबई व स्थानिक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत खा. विनायक राऊत व आ. वैभव नाईक यांचा यावेळी सत्कार करत त्यांचे आभार मानले.

यावेळी जी.प. गटनेते नागेंद्र परब, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, संग्राम प्रभुगावकर, छोटू ठाकूर, नाना नेरूरकर, पंकज वर्दम,विजय पालव, बंडु चव्हाण, अमित भोगले, राहुल परब, सोमनाथ माळकर, पराग नार्वेकर, किरण प्रभु, सुभाष धुरी, मोहन घाडीगावकर, श्री. मिठबावकर, अरुण भोगले, भाऊ चव्हाण, मालोंड येथील सरपंच वैशाल घाडीगावकर, नवनाथ घाडीगावकर, बाळा परब, कमलाकर सुर्वे, गोविंद वाडकर, अनिल परब, मकरंद तांडेल, सुवास सुर्वे, सुभाष परब, पांडुरंग तांडेल, जयवंत पारकर, नवनाथ घाडीगावकर, बाबा गावकर, महाराष्ट्र सागरी मंडळाचे सचिन गायकवाड, रस्ता ठेकेदार आशिष परब, जेटी ठेकेदार विनोद कन्ट्रक्शन व बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा