You are currently viewing उमेद अभियानातील कंत्राटी कामगारांच्या प्रशांकडे उपमुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्र्यांचे लक्ष वेधणार

उमेद अभियानातील कंत्राटी कामगारांच्या प्रशांकडे उपमुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्र्यांचे लक्ष वेधणार

राष्ट्रवादीचे जिल्हा उपाधयक्ष अनंत पिळणकर यांचे आश्वासन

कणकवली

राज्य सरकारने उमेद ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत कंत्राटी स्वरुपात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अचानक पुनर्रनियुक्ती थांबविण्याचे आदेश दिल्यामुळे राज्यभरातील चार हजारहून अधिक अधिकारी व कर्मचारी यांची अभियानातील सेवा संपुष्टात आली असून त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा यासाठी आपण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे लक्ष वाढणार असून या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देणार असल्याचे अश्वसन राष्ट्रवादीचे जिल्हा उपाधयक्ष अनंत पिळणकर यांनी दिले आहे.

आज सिंधुदुर्ग नागरी येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उमेद ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील कर्मचा-यानी एक दिवशीय धरणे आंदोलन केले. या आंदोलनाला अनंत पिळणकर यांनी भेट दिली. यावेळी आंदोनकारी कर्मचाऱ्यांनी आपली व्यथा मांडली. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस रुपेश जाधव, कृषी सेलचे जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, युवा पदाधिकारी देवेंद्र पिळणकर, गौरेश पारकर, सिंधू संघर्ष कर्मचारी कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष निलेश वालावलकर, सचिव अरुण कांबळे, सदस्य शिवाजी खरात आदी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये सन 2013 पासुन उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची अंमलबजावणी सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्हृयामध्ये उमेद अभियानांतर्गत स्वयंसहाय्यता समूह सक्षमीकरणाची (बचत गट) प्रभावीपणे अंमलबजावणी होवून स्वयंसहाय्यता समूहाचे जाळे मोठ्या प्रमाणात तयार झाले आहे. ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समूहांतून लाखो कुटुंब उमेद अभियानाला जोडली गेलेली असून त्यामूळे गरीब कुटूंबांना रोजगार व उत्पन्न वाढीच्या संधी प्राप्त होवून त्यांचे जीवनमान उंचावन्यास सुरुवात झालेली आहे. मात्र हे ज्या कर्मचाऱ्यांनी घडवून आणलं त्या उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत कंत्राटी स्वरुपात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अचानक पुनर्नियुक्ती थांबविण्याचे आदेश आल्यामुळे सध्यस्थितीत चार हजारहून अधिक अधिकारी व कर्मचारी यांची अभियानातील सेवा एका क्षणात संपुष्टात आली असून उर्वरित अधिकारी व कर्मचारी यांच्या बाबतीतहि नजीकच्या काळात हीच वेळ येण्याची शक्यता आहे.असे या कर्मचाऱ्यांनी सांगितले. तसेच अनंत पिळणकर यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देत आपला प्रश्न शासन स्थरावर लावून धरावा अशी विनंती केली.

यावेळी अनंत पिळणकर यांनी आपण या प्रश्नांचा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या सहकार्याने उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे पाठपुरावा करतो. एकही कर्मचाऱ्यावर अन्याय होणार नाही यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. उमेद अभियानातील सर्वच कर्मचाऱ्यांनी जिल्ह्यात खूपच चांगले काम केले असून ग्रामीण भागातील महिला भगिनींना रोजगाराची एक नवी दिशा दिली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या कठीण काळात आपण खंबीरपणे त्यांच्या सोबत आहोत असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा