आबाचो बाबा !
आबा बांबार्डेकाराक दशावतारी नाटका आवडत तर तेच्या बापाशिक सामाजिक. गावातल्या नाटकांत ते हिरोची भूमिका करीत. गोयातसून नटी आणित.
आबा ल्हान, शाळकरी पोर. आवस आबाक घेवन रात्री नाटक बघूक गेली. नाटक दशावतारी नसल्या कारणान आबा कंटाळलो. कीटकीट करुक लागलो, पण घोवाच्या कौतुकात रमलली आबाची आवस, तेका थारवन धरी होती, ‘बाबा बघ मरे’ म्हणी होती.
तसा नाटक संपत इल्ला पण आबा खूपच कळीक इलो. शेवटाक रवलला नाटक उभ्या उभ्याच बघीत ती घराक इली. अंथरुणा घालता म्हणासर दाराची कडी वाजली. आबाचो बाबा इल्लो, बायलेन दार उघडल्यान. ‘कसा झाला नाटक, आबाक आवाडला काय नाय?’. . .आबाच्या बाबान इचारल्यान.
तितक्यात रडतच आबा उठलो, दारापाठली कपडे सुकत घालूची काठी घेतल्यान आणि बापाशिक बडवक सुरवात केल्यान, चार सणसणीत गाळीय मारल्यान, ‘ माका दुसरी आई नको, ती बाई ईली तर पेटून काढतलय, दोघांकाय घरात घेवचय नाय!’
उडाणटप्पू
aryamadhur.