समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांची माहिती
सिंधुदुर्गनगरी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जातीवाचक नावे असलेल्या वस्त्यांची नावे बदलण्याची काम हाती घेण्यात आली असून आतापर्यंत ६८ वस्त्यांची नावे बदलण्यात आली असल्याची माहिती समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांनी आज दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अद्यापही अनेक मागास वत्यांना व रस्त्यांना जातीचा उल्लेख असलेली नावे आहेत. पूर्वीपासून या वस्त्यांना विशिष्ट जातीवरून ओळखले जाते. मात्र जातीय विषमता दूर व्हावी, जातीवरून वस्त्यांची ओळख असू नये, यासाठी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत ठराव करून जिल्ह्यातील जातीवाचक नावे असलेल्या वस्त्या आणि रस्त्यांची नावे बदलण्यात यावी. अशी मागणी केली होती. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व वस्त्यांचा सर्वे करून ज्या वस्थाची नावे जातीचा उल्लेख करून ठेवण्यात आली आहेत. अशा वस्त्यांची नावे बदलण्याचे काम करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात १९० वस्त्याची नावे जातीचा उल्लेख असलेले आहेत अशा वस्त्यांची नावे बदलण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. त्यानुसार १९० वस्त्यापैकी प्रस्ताव प्राप्त झालेल्या ६८ वस्त्याची नावे बदलण्यात आली आहेत. तर अद्याप अश्या १२२ वस्त्यांच्या नावात बदल करण्याचा आहे, त्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीच्या ठरावा सह प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या गावात जातीवाचक नाव असलेल्या वस्त्या असतील तर ती नावे बदलून घेण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत. असे आवाहन सभापती अंकुश जाधव यांनी केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अद्यापही १२२ वस्त्याची नावे बदलायची आहेत. त्यामध्ये कुडाळ १६, कणकवली ३, देवगड ७३, वैभववाडी १६ मालवण १४ अशा १२२ वस्त्याचा समावेश आहे. तर आतापर्यंत कुडाळ तालुक्यातील २४, कणकवली ०१, दोडामार्ग ०५, वेंगुर्ला ०७, देवगड ०८, मालवण १८, सावंतवाडी ०५, अशा एकुण ६८ वस्त्यांची नावे बदलण्यात आली असल्याची माहिती यावेळी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांनी ग्रामपंचायत विभागाकडून मिळालेल्या अहवालानुसार दिली.