You are currently viewing मी एक कवयित्री

मी एक कवयित्री

*जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सदस्या लेखिका कवयित्री अख्तर पठाण यांची अप्रतिम काव्यरचना

मी एक कवयित्री फक्त कविता लिहीते
अलीकडे बसून पलीकडे पाहते
भुतकाळ माझा वर्तमान ही माझा
पाण्यासारखी भविष्याकडे वाहते

*कष्टकऱ्यांचे दुःख शब्दातून मांडते*
*शेतकऱ्यांसाठी शासनाशी भांडते*
*गोरगरीबांची भुक आणि तहान*
*ऊखळात कल्पनेच्या मुसळाने कांडते*

*प्रेमातील विरहाचा बघते मी आकांत*
*प्रियकर प्रेमिका मला दिसताच अशांत*
*त्यांचीही आसक्ती कागदावर चितारते*
*गर्दीतही त्यांना मिळवून देते एकांत*

*संस्थेला ज्यांच्या मिळत नाही अनुदान*
*त्यांच्या ही त्रासाचे काढते मी अनुमान*
*जिथे तिथे पुढे असते लेखणी घेऊन*
*सन्मान स्विकारते गिळून घेते अपमान*

*आयुष्य सारे माझ्या देशासाठी झिजवते*
*भ्रष्टाचार पेटवून शिष्टाचार शिजवते*
*देशद्रोहाची समाजात लागलेली आग*
*राष्ट्रवादाच्या पाण्याने कायमची विझवते*

*मी कवयित्री माझे शब्द सारे शस्त्र*
*कविता माझी एकमेव अस्त्र*
*शत्रूंचा नायनाट करण्यासाठी मित्रांनो*
*शब्द माझे बनतात प्रसंगी अण्वस्त्र*

 

✍🏻 *अख्तर पठाण*
*नासिक रोड*

This Post Has One Comment

  1. Vilas kulkarni

    अतिशय गुणी कवयित्री अख्तर यांची लेखणी बहारदार होत चालली आहे . मस्तच

प्रतिक्रिया व्यक्त करा