मालवण तालुक्यातील नांदोस सुतारवाडी येथील रघुनाथ मुकुंद मेस्त्री यांच्या राहत्या घरात मंगळवारी सायंकाळी विजेचा लोळ घरात घुसला. त्यामुळे घरातील सर्व विद्युत उपकरणांचे मोठे नुकसान झाले. यामध्ये विद्युत मीटर, फ्रिज, वॉशिंग मशीन, टीव्ही, पंखे, इत्यादीसर्व साहित्य खराब झाले.
घरात विजेचा लोळ ज्यावेळी घुसला त्यावेळी रघुनाथ मेस्त्री यांची पत्नी, घरात काम करत असताना विजेचा सोम्य झटका त्यांच्या पायाला बसला.
हा विजेचा लोळ घराच्या बाहेर असल्या जमिनीतून नारळाचे झाड पडून बाहेर पडला. या घटनेवेळी मोठा आवाज झाला.
तो आवाज ऐकताच मेस्त्री यांच्या घराकडे शेजाऱ्यांनी धाव घेतली. ही घटना समजताच वीज वितरण कर्मचारी, नांदोस सरपंच आरती नांदोसकर, अशोक नांदोसकर, तलाठी वालावलकर, प्रकाश सरमळकर, विजय निकम, रवींद्र मेस्त्री, दर्पण मेस्त्री, रामचंद्र मेस्त्री, किशोर मेस्त्री, गणेश मेस्त्री, जगदीश मेस्त्री, वैभव मेस्त्री, बाळकृष्ण गोंधळी, किरण मेस्त्री व ग्रामस्थांनी मदतकार्यात सहभाग घेतला.