जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्री चंद्रशेखर धर्माधिकारी यांची काव्यरचना
प्रीतीच्या अंबरात च्ंद्र मी पाहिला
लाजता असा मनात चंद्र मी पाहिला
कुजबुजती तारका कळेना गेला कुठे?
वस्तीला माझ्या उरात चंद्र मी पाहिला
डोंगर ढगाआड व्यर्थ का हो शोधीता
अहो!इष्काच्या डोहात चंद्र मी पाहिला
चुकवुनी चांदण्यास आतुर मज भेटावया
हवा हवासा स्वप्नात चंद्र मी पाहिला
रमलो मस्तीत आकाशगंगेच्या तीरी
पेटलेला प्रणयात चंद्र मी पाहिला
भटकंती नभांगणी घेऊनी मजसवे
रोज नवनव्या रुपात चंद्र मी पाहिला
दिसेनासा होतो कधी सवय त्याची जुनी
परि अवसेचा इष्कात चंद्र मी पाहिला
चंद्रशेखर द. धर्माधिकारी
वारजे पुणे.
छान