You are currently viewing जवळ दूर

जवळ दूर

जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी गझलकार श्री अरविंदजी ढवळीकर यांची काव्यरचना

प्रश्न मनाला छळतो विरहास व्यथा कां वदती ?
दूर किनारे जाताना म्हणतात त्यास कीं भरती

प्रेमात सफलता केवळ कां मीलन हीच प्रचिती
जर वेल मुळाशी गुंते फुलतील फुले कां वरती

जग उजाड झाले असते जीवना अर्थ ना उरती
किरणे जर दूर न येती तरी सूर्याहून धरती वरती

सागरात जल धारा त्या तेंव्हाच तयाना महती
जाऊन दूर अंबरी त्या घन होऊन पुन्हा बरसती

जवळ दूर ही कोडी सहज मग अंतर्यामी सुटती
अस्तित्व नसे अंधारा ना प्रकाश त्याला म्हणती

स्वर प्रेमाचे गाताना धरी विरहाची कशास भीती
तू माझा तुझी मी आपुली ही जन्म जन्मीची नाती

अरविंद

प्रतिक्रिया व्यक्त करा