You are currently viewing महागाई विरोधात राष्ट्रिय काँगेस ची दोडामार्ग बाजारपेठेत रॅली

महागाई विरोधात राष्ट्रिय काँगेस ची दोडामार्ग बाजारपेठेत रॅली

जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी साधला संवाद

केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने कृत्रिमरीत्या महागाई वाढवून देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केल्याच्या निषेधार्थ दोडामार्ग बाजारपेठेतून जनजागरण फेरी काढून पत्रके वाटण्यात आली.


यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे,जिल्हा उपाध्यक्ष तथा प्रवक्ते इर्शाद शेख, दोडामार्ग तालुका अध्यक्ष वासुदेव नाईक, जिल्हा सचिव बाळा धाऊसकर,सुभाष दळवी,शहर अध्यक्ष सुधीर गवस, सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष समीर वंजारी,सुमंत मणेरीकर,सुधीर चांदेलकर,बाबू गवस, आशा जाधव, शिवदास मणेरीकर,अंकुश गवस, राजन साळकर,गुणाजी गवस, आनंद नाईक, किशोर लोंढे, सत्यवान गवस, शुभम गवस इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या सेख्येने उपस्थितीत होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा