You are currently viewing सुक्यो गजाली . . .
चकणो आबा !

सुक्यो गजाली . . .

चकणो आबा !

आबा बांबार्डेकार दिसाक वायट नसलो तरी ब-यापैकी चकणो. नेमको खय बघता ताच कळा नाय. परवा हॉटेलचो वेटर विचारी होतो, ‘काय हो तुमचो तो दोस्तदार खय आज?’

‘कोण? बांबार्डेकार, गोन्साल्विस काय इन्सुलकार?’ . . . मी.

‘तो जाडो, रेटलोबा; बघता भज्यार . . मागता वडो, तो!’ . . वेटर.

एकदा गांधी चौकात तर मजाच झाली. आबा स्कूटरीन घाय घायत घराक जाय होतो, तितक्यात समोरसून अचानक चौकुळचो बाजी आडवो इलो, आबाच्या नजरेवरसून बाजीक आबा खय वळतलो तेचो अंदाज येयना, दोघय समोरासमोर येवक लागले.

आबा वैतागलो, ‘काय बाजी! हुतूतू खेळतसय?’

बाजीय करवादलो, ‘तू बघतय खय, वळतय खय ताच कळाना!’

‘बरा, बरा’ म्हतल्यान आणि आबान सायट मारल्यान.

उडाणटप्पू

aryamadhur.

प्रतिक्रिया व्यक्त करा