हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांचा ७ वा स्मृतिदिनानिमित्त डबलबारी भजनाचा तिरंगी सामना कनेडी ( सांगवे) बाजारपेठ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हा बँक अध्यक्ष सतिशजी सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. सोबत अतुलजी रावराणे, माजी जि. प. सदस्य बाळा भिसे, तालुकाप्रमुख डॉ. प्रथमेश सावंत, विभागप्रमुख आनंद आचरेकर, बंड्या रासम, पं. स. सदस्य मंगेश सावंत, कुंभवडे सरपंच अप्पा तावडे, युवासेना गुरू पेडणेकर, उपसरपंच भिरवंडे नितीन सावंत, आनंद ठाकूर, बेनी डिसोझा, संतोष सावंत, महेंद्र डीचवलकर, सापळे मॅडम , बुवा संतोष जोईल, बुवा संदीप पुजारे, बुवा विनोद चव्हाण तसेच शिवसेना नाटळ व हरकुळ बुद्रुक विभागातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद आचरेकर यांनी केले. यावेळी सतीश सावंत यांनी बोलते वेळी या स्मृतिदिनाचे औचित्य साधून नाटळ व हरकुळ बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघावर भगवा फडकुया आणि विरोधकांची मक्तेदारी मोडीत काढून पुढील वर्षीच्या स्मृतिदिनाला २ जिल्हा परिषद सदस्य व ४ पंचायत समिती सदस्य स्टेजवर दिसतील या पद्धतीने कामाला लागूया आणि ज्यांची कोणाची मक्तेदारी आहे त्यांची मोडीत काढण्याचा संकल्प आज करूया असे सांगितले.