You are currently viewing कंगणा राणावत विरोधात वैभववाडी तालुका कमिटीच्या वतीने पोलीस ठाण्यात तक्रार

कंगणा राणावत विरोधात वैभववाडी तालुका कमिटीच्या वतीने पोलीस ठाण्यात तक्रार

वैभववाडी

“भारताला १९४७ मध्ये मिळालेलं स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून ती एक भीक होती” असं वक्तव्य करणाऱ्या वादग्रस्त सिने अभिनेत्री कंगणा राणावत हिच्या विरोधात वैभववाडी तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने वैभववाडी पोलीस स्टेशनमध्ये तालुका सेवादल अध्यक्ष अशोक सिताराम राणे, यांच्या
सहीने तक्रार अर्ज देत दखलपात्र गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही होण्याबाबत वैभववाडी पोलीस निरीक्षक यांना पत्र देण्यात आले आले आहे. यावेळी वैभववाडी काँग्रेस तालुकाध्यक्ष दादामिया पाटणकर तसेच उपाध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटीचे वसंत अनंत नाटेकर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा