लेख सादर: अहमद मुंडे
आपल्या रोजच्या जीवनात सर्वांना परिचयाचा असणारा शब्द आहे की जो आपले घर अंगण परिसर गाव तालुका जिल्हा राज्य देश घाणीपासून मुक्त करण्यासाठी वापरलेले जाणारे प्रभावी शस्त्र म्हणजे “खराटा” होय. फक्त फोटोसाठी खराटा हातात घेणारे नेते पुढारी आमदार खासदार मंत्री यांनी ढोंग बंद करा
गौतम बुद्धापासून गाडगेबाबा पर्यंत किंवा महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यापर्यंत पाहिले तर समाज विकासासाठी काम करणारे ही लोकं. या माणसांना समाजाच्या जाचापासून जावे लागले त्यांना स्वच्छता महत्व समाजावून सांगण्यासाठी लोकानी अंगावर शेण टाकले, शिव्या घातल्या, चांगल्या कामाची आधी उपेक्षा करावी नंतर विरोध करावा आणि शेवटी स्वीकार करावा अशी समाजातील रित आहे. स्वच्छता म्हणजे प्रसन्नता, स्वच्छता म्हणजे पवित्रता, स्वच्छता म्हणजे समाधान, स्वच्छता म्हणजे आनंद, स्वच्छता म्हणजे प्रगती, स्वच्छता म्हणजे स्वावलंबन, स्वच्छता म्हणजे सर्वोद्धार, स्वच्छता म्हणजे# स्व कडून #पर # कडे जाण्याचा मार्ग. स्वच्छता म्हणजे प्रदुषण पासून मुक्तता. स्वच्छता म्हणजे पर्यावरणास पर्याय, स्वच्छता म्हणजे आरोग्य, स्वच्छता म्हणजे स्वच्छता. आणि स्वच्छता म्हणजे सर्वोदय. या विचारसुत्राचा कृतिशील सुंदर आविष्कार म्हणजे. गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान.
स्वच्छता म्हणजे मानवी जीवनाचा आधारस्तंभ आहे. अन्न हवा आणि पाणी शुध्द स्वरूपात मिळणे हा उत्तम जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. अस्वच्छतेमुळे अन्न हवा पाणी दुषित होते त्यामुळे अनेक साथीचे आजार रोगांना निमंत्रण मिळते आजारपण वाढते. आजारपणाची कैद माणसाला असह्य होते. या कैदेतून सुटका करण्यासाठी पैसा अडका कमी पडल्यास मृत्यू अटळ. जगणे संपते, अनमोल जीवन संपते, उरते ते फक्त दुःख. मानवाने जीवनातील हे दुःख ओळखले पाहिजे. मानवी जीवनात स्वच्छतेचा # निर्मळ झरा # निर्माण केला पाहिजे निर्मळ तेच्या मंत्राने लोकांचे मन परिवर्तन केले पाहिजे. सर्वांच्या हदयाची दारे खुली करून त्यात निर्मळ तेचे झरे सोडणे गरजेचे आहे. एका अक्षरशून्य माणसाच्या हातातील खराटा हजारों माणसाच्या मनात # स्वच्छतेचा नंदादीप # लावू शकतो तो तेवत ठेवू शकतो. ही शब्दावली समाजसेवक यांनाच शोभून दिसते. ही बिरुदावली बाबांच्या बाबतींत खरी वाटते लोकसेवेसाठी आपले पूर्ण जीवनाची होळी करणारे समाजसेवक पाहिजेत. आपल्या हाती. # स्वच्छतेचा कंदील # घेवून सर्वांना स्वच्छतेचा उजेड दाखविणे गरजेचे आहे समाजसेवक यांनी व आपण हातात खराटा घेऊन सार्वजनिक स्वच्छता केली म्हणजे श्रमशक्तीचे संस्कृतींचे उदात्तीकरण केले पाहिजे. स्वच्छतेला परमेश्वर महणा किंवा परमेश्वराला स्वच्छता म्हणा अशा या प्रमेयात अडकून न पडता स्वच्छता करण्याचा कामांचा आजच पुढाकार घेऊन स्वच्छतेला परमेश्वर माणने गरजेचे आहे. हातातली खराटा हा आपल्या श्रमसंस्कृतीवर साचलेली धुळ नष्ट करण्याचे साधनं आहे. महारोग्यानी केलेली शारीरिक स्वच्छता हा तर श्रम संस्कृतीचा एक पाठपुरावाच असतो.
आपणच आपल्या महाराष्ट्रात स्वच्छतेचे आंदोलन निर्माण करणे गरजेचे आहे त्यामुळे खेडोपाडी # स्वच्छतेचे वारे # वाहू लागेल. लोकमत जागे करा. लोकांना सज्ञानी करा. लोकांना नम्रता शिकवा. लोकांना आरोग्य संपन्न बनविण्याचे काम करा. लोकांच्या मनात चैतन्य फुलवा. लोकांची प्रगती साधा. लोकमत सदैव प्रफुल्ल ठेवण्यास मदत करा. यासाठी आपणास उपयोगी पडणार म्हणजे खराटा. विषमतेकडून सत्तेकडे. विसंवादाकडून संवादाकडे. जनतेकडून चैतन्य कडे. विघातकाकडून. विधयाकडे. उदासिनतेकडून उत्साहाकडे. विफलतेकडून सफलतेकडे. विद्वेषाकडून विनयाकडे. अचेतनाकडून सचतेनाकडे. विनाशाकडून विकासाकडे. नैरेश्याकडून आनंदाकडे आणि द्वैताकडून अद्वैताकडे घेवून जाणारे एक सबल साधनं म्हणजे खराटा होय.
खराटा हा केवळ घर गाव रस्ते स्वच्छ करणारा नाही तो माणसांची मने स्वच्छ करणारा खराटा होय खराटा बाह्य स्वच्छतेकडून आंतर स्वच्छतेकडे नेणारा मार्ग म्हणजे खराटा होय. दिन दुःखी. दलित वंचित आणि शोषित माणसें पाहिली अवकाशात सोडलेल्या बिन दोरिच्या पंतगाप्रमाणे समुद्रात वार्यावर सोडलेल्या होडीसारखी ही माणसें होती अशी माणसं पाहिली की मनाला अस्वस्थ होतं. आपल मन मेनबत्ती सारखें पागळून जाते. अशा तळागाळातील लोकांना कोणीच वाली नाही हे पाहून मन घायाळ झाले आहे. घरात. दारात आणि गावांत स्वच्छतेची नितांत गरज आहे स्वच्छता ही आपल्या जीवनाची गुरुकिल्ली आहे. सवचछतेशिवाय. घर दार आणि गाव कोंडवाडा सारखे होईल म्हणजे अनेक दिवसांची मुलखाची घाण. जिथे घाण तिथं रोगराई. जिथे रोगराई तिथे मृत्युला आमंत्रण. हे ओळखून स्वच्छता आपला परम धर्म शिरोधार्य मानले पाहिजे.
स्वच्छता करणारा अंगावरील चिंध्या घ्या अंगरखा हे गरिबांचे प्रतिक हातातील खराटा हे सामाजिक स्वच्छतेचे प्रतीक आहे. हे जीवन क्षणभंगुर आहे बांगडी आणि कवडी हे फाटक्या संसाराचे प्रतिक आहे. जसा खराटा स्वच्छतेवर वार आहे तसा काठी समाजाच्या दंभावर. ढोंगावर कर्मकांडावर. अन्यायावर. अहंकारावर. भ्रष्टाचारावर. दुरगुणावर. भोंदूगिरी वर. व्यसनाधीनतेवर अंधश्रद्धैवर हिंसाचारावर. अज्ञानावर. दैववादावर. आणि दुराचारी वर कठोर प्रहार करणारी काठी आहे. स्वच्छता. आरोग्य. ज्ञान. संपत्ती. त्याग. सेवा. काटकसर. साधेपणा आणि असंग्रह वृतीची आठवण करून देणारा खराटा होय. म्हणजे लोकजीवनात आनंदाचे वातावरण अंगण निर्माण करणारा खराटा आहे. गोरगरीब सुखी आणि समृद्ध संपन्न जीवनासाठी अहोरात्र राबणारा खराटा होय. दुःख. दैन्य. आतरता. व्याकुळता. घायाळता. आणि अस्वच्छता. दुखमय जीवनात सुखाची दिवाळी करण्यासाठी खराटया सारखा दुसरा धर्म नाही.
स्वच्छता ही आयुष्भर माणुसकीच्या आराधनेत रमली आहे. आपल्या त्यागाने. प्रेमाणे आणि सेवेने समाजाची दुखणी सुखद करण्याची गरज आहे. त्यासाठी समाजाच्या अंगणापर्यंत खराटा नेणे गरजेचे आहे. खराटा अंधश्रद्धा अंधार नष्ट करतो. समाजातील विषमता. पाखंडता. कर्मकांड. मूढता. नष्ट केली. समता प्रेम बंधुता बंधुभाव न्याय सदाचार. सौजन्य. समाज्याशी शिकवण. असा खराटा होय.
समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रूग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९