You are currently viewing संसदरत्न खासदार व शरद पवार कन्या सुप्रिया सुळे यांच्या हस्ते   सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या ‘सिंधु बँक ग्रुप पर्सनल अॅक्सिडंट’ विमा पॉलिसिचा शुभारंभ..

संसदरत्न खासदार व शरद पवार कन्या सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या ‘सिंधु बँक ग्रुप पर्सनल अॅक्सिडंट’ विमा पॉलिसिचा शुभारंभ..

सातत्याने शेतकरी व जिल्हा बँकेचे सभासद तसेच खातेदार यांच्यासाठी नाविन्यपूर्ण योजना राबविणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या माध्यमातून आता ‘सिंधु बँक ग्रुप पर्सनल अॅक्सिडंट’ विमा पॉलिसीची सुरुवात करण्यात आली आहे. त्याचा शुभारंभ संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी त्यांनी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेच्या गौरवशाली वाटचालीचे विशेष कौतुक केले. सतीश सावंत यांच्या अभ्यासू नेतृत्वाखाली जिल्हा बँकेने शेतकऱ्यांसाठी राबविलेल्या अनेकांगी योजना सहकार क्षेत्रात राज्यातील अन्य बँकांना मार्गदर्शक व आदर्शवत असल्याचे सांगत त्यांनी जिल्हा बँकेच्या वाटचालीचे कौतुक केलं.
सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असलेल्या खासदार सुळे यांनी जिल्हा बँकेला आवर्जून भेट दिली. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, उपाध्यक्ष सुरेश दळवी, व्हिक्टर डॉन्टस, प्रवीण भोसले, विकास सावंत, एम.के.गावडे, प्रज्ञा परब, प्रकाश गवस यांसह अन्य संचालक, जिल्हा बँकेचे सीईओ अनिरुद्ध देसाई, अधिकारी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

यावेळी खासदार सुळे यांनी चेअरमन सतीश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेने घेतलेली गरुडझेप अभिमानास्पद आहे असे मत व्यक्त केले. तर सतीश सावंत यांसह उपस्थित संचालकांना शुभेच्छा दिल्या. आगामी जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हि खासदार सुळे यांची जिल्हा बँक भेट महत्वपूर्ण मानली जात असून महाविकास आघाडीच्या माध्यमातून जिल्हा बँक लढवली जाणार आहे हे आता यानिमित्ताने अधोरेखित झालं आहे. शिवाय अध्यक्ष सतीश सावंत यांच्या नेतृत्वाचेही राष्ट्रवादी श्रेष्ठीनीं कौतुक केल्याने आगामी जिल्हा बँक निवडणूक सतीश सावंत यांच्याच नेतृत्वाखाली लढवली जाईल हे सुद्धा अधोरेखित होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा