जागतिक मराठी “साहित्य कला व्यक्ती” विकास मंचच्या सदस्या, विविध पुरस्कार प्राप्त जेष्ठ कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार यांची भक्तिमय रचना
विठ्ठलाच्या दारी आषाढी कार्तिकी
किर्तनी रंगती भाविक हो
किर्तनाचा रंग किर्तनाचा ढंग
अवघा श्रीरंग पांडुरंग ….
चंद्रभागा माय माऊली जगाची
पावन ते तीर्थ पाप नाश
टाळमृदुंगाचा आभाळी गजर
जागर अवघ्या देवलोकी …
विठाई माऊली शीतल साऊली
जळमटे सारी जळतात
मन शांतावते मिटतात चिंता
पदरात घेई भगवंत …
नाम घेता देवा येतो कसा धीर
वादळ क्षणात शांत होई
चरण कमले नेत्रांजने होती
अवघाच भार डोई घेई ….
तुझा आहे धीर तुझ्यावर भार
करतोस कसा कारभार
हृदयी असावा देवा तुझा वास
एवढीच आस मनी माझ्या …
पाठव विमान पुण्यवान नाही
आहेस ना आई देवा माझी
गुन्हे घाल सारे पोटात रे तुझ्या
उचलून घेई कडेवरी ….
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : १५ नोव्हेंबर २०२१
(आषाढी एकादशी)