सावंतवाडी
सावंतवाडी तालुका कॉंग्रेस कमिटीची मासिक सभा हॉटेल रोयल इन हाउस रेस्टोरेंट येथे सावंतवाडी तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष “महेंद्र सांगेलकर” यांचा अध्यक्षतेखाली व सिंधुदुर्ग जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष “बाळा गावडे” यांच्या प्रमुख उपस्तिथीतीत संपन्न झाली
या सभेला सिंधुदुर्ग जिल्हा कॉंग्रेस चे उपाध्यक्ष श्री. अॅड. दिलीप नार्वेकर, जिल्हा प्रवक्ते इर्शाद शेख, जिल्हा सरचिटणीस एम एम सावंत, जिल्हा उपाध्यक्ष श्री. नागेश मोर्ये, सांस्कृतिक जिल्हाअध्यक्ष प्रविण वरुणकर, जिल्हा सरचिटणीस आनंद परुळेकर, शहर अध्यक्ष अॅड. राघवेंद्र नार्वेकर, तालुका सरचिटणीस रुपेश आईर, अन्वर खान, तालुका उपाध्यक्ष अशोक राऊळ, सच्चिदानंद बुगडे, समीर वंजारी, विभागीय अध्यक्ष अॅड. गुरु आईर, विलियम सालदाणा, सुरेश सांगेलकर, अभय मालवणकर, दत्ताराम पवार, अमिदी मेस्त्री, स्मिता वागळे, रवींद्र चव्हाण, बबन डिसौझा, व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंखेने उपस्थित होते.
या बैठकीला महारष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या सुचनेनुसार सावंतवाडी तालुक्यामध्ये कॉंग्रेस सभासद नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला व पुढील १५ दिवसांमध्ये प्रत्येक जिल्हा परिषद मतदार संघामध्ये : मोदी सरकारच्या महागाई विरोधात जनजागरण अभियान राबविण्याचे ठराव करण्यात आला व त्यानंतर विकासकामांचा व पक्ष संघटना वाढीसंदर्भात आढावा घेण्यात आला. पुढील होणाऱ्या निवडणुकांमध्ये सावंतवाडी तालुक्यात कॉंग्रेस पक्ष पूर्णपणे ताकतीने लढण्यासाठी तयार असल्याचे तालुकाध्यक्ष “महेंद्र सांगेलकर” यांनी सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष “बाळा गावडे” म्हणाले की येणाऱ्या काळामध्ये कॉंग्रेस पक्षाचा कार्यकर्ता सक्षमपणे उभा करण्यास वरिष्ठ पातळीवरती व विकासाच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील यासाठी लागणारी सगळी ताकद आपल्या परीने सिंधुदुर्ग जिल्हा कॉंग्रेस करेल व कार्यकर्तेच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. पक्षामध्ये प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्तेला संधी दिली जाईल असेही ते म्हणाले. यावेळी अॅड. दिलीप नार्वेकर, इर्शाद शेख, अन्वर खान, यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सभेचे सूत्रसंचालन व आभार शहर अध्यक्ष अॅड. राघवेंद्र नार्वेकर यांनी केले.