You are currently viewing सावंतवाड़ी येथे बाल संस्कार शिबिर उत्साहाने सम्पन्न

सावंतवाड़ी येथे बाल संस्कार शिबिर उत्साहाने सम्पन्न

आचार्य इन्स्टिट्यूट् ऑफ संस्कृत अॅण्ड योग सिंधुदुर्ग आयोजित बाल संस्कार शिबिर ऑनलाइन पद्धतीने नोव्हेम्बर महिन्याच्या ८ ते १३ तारखेपर्यन्त सावंतवाड़ी येथे, उत्साहाने सम्पन्न झाले.
मुले संस्कारित व्हावी, संस्कृतिचे धड़े बाल्यकाळातच प्राप्त व्हावे,संस्कृतिची जाणीव व्हावी,संस्कारांमुळे समाजात उत्तम नागरीक होतात. संस्कारात् द्विज उच्यते इति ।
संस्कारांमुळे मनुष्य समाजात सुप्रतिष्ठित होतो.
याच उद्देशाने बाल संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात ,विविधे स्तोत्रे ध्यानमन्त्र / दिनचर्या पूजा ,संस्कृत, कथा शिकविण्यात आल्या। शिबिरात एकूण २५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
मार्गदर्शक म्हणून आचार्य महेश मस्के, हे (पुणे ) येथून उपस्थित होते. तसेच आचार्य हरिश्चन्द्र हे मार्गदर्शनाकरीता उपस्थित होते.
आचार्य इंस्टिट्यूट् सिंधुदुर्ग या इंस्टिट्यूट्च्या सदस्यांद्वारे चांगल्या प्रकारे शिबिराचे आयोजन करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा