जागतिक मराठी “साहित्य कला व्यक्ती” विकास मंचच्या सदस्या, विविध पुरस्कार प्राप्त जेष्ठ कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार यांची काव्यरचना
सिक्स्टीप्लस सेकंड इनिंग
इट्स जस्ट गुडमॅार्निंग
से हॅलो नॅाट इव्हिनिंग….
इट्स जस्ट हेल्थ वॅार्निंग ….
हॅपी हॅपी हॅपी होम
जरी विचारत नाही कोण
आनंदाचा भरा द्रोण
ना तर आपले धरा मौन …
राग लोभ ? कोसो दूर …
नो नो नो कुरकुर
आसवांचा नको पूर
नसलात तरी व्हावे शूर…
रडणे नको कुढणे नको
भले कुणी नाही ऐको
मानपान मारा गोळी
त्यानेच आयुष्याची होळी…
प्रेम द्यावे प्रेम घ्यावे
फक्त गोडच गोड बोलावे
हात असो देण्यासाठी
आपोआप मिळते काठी…
मन असो सदा हिरवे
ठेवली जरी कुणी नावे
आपला त्याला वाटतो हेवा
त्याला जरा दूरच ठेवा …
पथ्ये पाळा आरोग्याची
झुल्यावरती मस्त झुला
सुंदर दिसा सुंदर हसा
जळणारा उडत गेला ….
पॅाझिटिव्ह ठेवा माइंड
गॅाड इज सो काइंड
हंड्रेडप्लस नाईन नाईन
इट विल् बी फाईन फाईन …..
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि: १५ नोव्हेंबर २०२१