मुंबई :
काल हवामान खात्याच्या अंदाजनुसार मुंबई शहर आणि उपनगराला पाऊसाने झोडपून काढले आहे. तसेच हवामान खात्याने मुंबईत जोरदार पाऊस पडण्याचा इशाराही दिला होता. त्यानुसार मंगळवारी सायंकाळपासून मुसळधार पावसाने सुरूवात केली. या मुसळधार पावसामुळे मुंबई आणि उपनगरातील अनेक सखल भागांत पाणी भरले आहे. रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. अनेक रेल्वे मार्गावरील स्टेशन आणि सखल भागात नेहमी प्रमाणे जास्त पाऊस झाल्यावर जी स्थिती होते, तशी स्थिती झाली होती.
रेल्वेरूळ पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. सायनजवळ लोकल खोळंबल्याने अनेक अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी प्रवाशांची कोंडी झाली आहे.
सायंकाळनंतर पावसाचा जोर वाढला होता तसेच सुमारे तीन तास सर्वत्र मुसळधार पाऊस बरसत होता.
गोरेगावमध्ये अनेक रस्ते जलमय झाले आहेत. रस्त्यांवर पाण्याचे मोठे लोट पाहायला मिळत आहेत. मालाड, अंधेरी, खार, दादर या भागांतही पाणी भरले असून बेस्टने अनेक मार्गांवरील वाहतूक अन्य मार्गांवर वळवली आहे. मुंबई पालिकेने याबाबत ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे.