You are currently viewing प्राकृतिक पेंट प्रकल्प प्रशिक्षणासाठी राजू पवार यांची निवड  *प्रशिक्षणात देशातील निवडक 25 व्यक्ती होणार सहभागी :

प्राकृतिक पेंट प्रकल्प प्रशिक्षणासाठी राजू पवार यांची निवड *प्रशिक्षणात देशातील निवडक 25 व्यक्ती होणार सहभागी :

प्रशिक्षणात देशातील निवडक 25 व्यक्ती होणार सहभागी : 22 नोव्हेंबर रोजी जयपूर येथे होणार प्रशिक्षण

वैभववाडी-

केंद्र शासनाच्या खादी ग्रामोद्योग विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या प्राकृतिक पेंट (गाईच्या शेणापासून) प्रकल्प प्राशिक्षणासाठी जिल्ह्यातून अभिजित उर्फ राजू पवार यांची निवड झाली आहे. या प्रशिक्षणासाठी देशातुन निवडक 25 व्यक्ती निवडण्यात आल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्हातुन श्री राजु पवार यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

सोमवार दि. 22 नोव्हेंबर पासून हे प्रशिक्षण जयपूर राजस्थान कुमारप्पा राष्ट्रीय हस्तनिमित्त कागद संस्था येथे होणार आहे. ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था बदलण्यास हा प्रकल्प महत्वपूर्ण भुमिका बजावणार आहे. या नव्या प्रकल्पामुळे नैसर्गिक रंगांची उत्पादन क्षमता दुप्पटीने वाढणार आहे. गाईच्या शेणा पासून तयार होणारा कलर हा प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच होत आहे. या प्रकल्पासाठी लागणारे गाईंचे शेण हे शेतकऱ्यांकडून 5 रुपये किलोने विकत घेतले जाणार आहे. किंबहुना शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

राजू पवार हे वैभववाडी तालुक्यातील एडगांव गावचे सुपुत्र आहेत. कोकणचे भाग्यविधाते, माजी मुख्यमंत्री, केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे साहेब यांच्या आशिर्वादाने श्री. पवार यांची निवड झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्हातुन प्रशिक्षणासाठी निवड होण्यासाठी लोकप्रिय आमदार नितेश राणे, सिंधुदुर्ग बॅंकेचे संचालक अतुल काळसेकर, डॉ.मिलिंद कुलकर्णी, अमोल गवळी, तसेच खादी ग्रामोद्योग मंडळ महाराष्ट्रचे सीईओ श्री संजय यादव यांचे राजू पवार यांना मार्गदर्शन लाभले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा