बांदा
ग्रामपंचायत निगुडे येथे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी करण्यात आली. निगुडे उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी नेहरूंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
श्री गवंडे म्हणाले बालदिन साजरा करताना आपण अर्थातच चाचा नेहरूंचे त्यामागील विचार समजून घ्यायला हवेत. मुलामुलींना सुरक्षित आणि प्रेमाच्या वातावरणात वाढवले गेले पाहिजे तसेच त्यांना आपले आयुष्य फुलवण्याच्या आणि पर्यायाने देशाच्या विकासात भर घालण्याच्या समान संधीही मोठ्या प्रमाणात मिळाल्या पाहिजेत.
भारताच्या प्रदीर्घ स्वातंत्र्यलढ्यानंतरचे पहिले पंतप्रधान होते पंडित नेहरू. बालकांविषयी पंडित नेहरूंना वाटणार्या प्रेमाची आठवण म्हणून १४ नोव्हेंबर हा त्यांचा वाढदिवस आपल्या देशात बालदिनाच्या रूपाने साजरा केला जातो. मुलांसाठी शिक्षण आरोग्य संस्कृती हे फारच महत्त्वाचे असते कारण हेच मुले आपल्या देशाचं भवितव्य घडवणारे असतात. यावेळी निगुडे तंटामुक्ती अध्यक्ष वासुदेव गावडे, ग्रामसेविका तन्वी गवस, अंगणवाडी सेविका प्रियांका राणे, रंजना सावंत, नूतन निगुडकर, मदतनीस लक्ष्मी पोखरे, विजयालक्ष्मी शिरसाट, साहिल जाधव, अनवी म्हाडगुत, विराज जाधव, वेदांत जाधव, तन्वी जाधव, विरेन जाधव, विद्याधर जाधव ग्रामपंचायत कर्मचारी लहू जाधव, सुचिता मयेकर आदी उपस्थित होते.