You are currently viewing ||जीवनाचे सत्य||

||जीवनाचे सत्य||

  • Post category:इतर
  • Post comments:0 Comments

विचारमंथन

तुम्ही तुमच्या आयुष्याला कंटाळला आहात?  तुम्ही रोज दुःखी असता? तुम्हाला तुमच्या आयुष्यात निराशा आहे तर थांबा…! एकदा माझे विचार वाचा त्यावर विचार करा. कदाचित त्यामुळे तुमचे विचार बदलतील, आयुष्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलेल आणि तुमच गुरफटलेल आयुष्य, तुमचं मन, तुमचे विचार पूर्णपणे बदलून जातील आणि तुम्ही खुश राहू शकता.
ज्या शरीराला हा समाज सुंदर समजतो, तेच शरीर मरण आल्यावर आपण जाळतो किंवा पुरून टाकतो. शरीर जर खूप सुंदर आहे तर मग ते मरणानंतर घरात का ठेऊन देत नाहीत..? ज्या शरीराला तुम्ही सुंदर समजता जरा त्या शरीरावर ची कातडी उतरवून तर बघा ….!तेव्हा सत्य समजेल की शरीरात काय आहे? शरीरात तर रक्त, रोग, मळ आणि कचरा भरलेला आहे, तर मग हे शरीर सुंदर कसे? शरीरात खरच सुंदरता आहे का? नाही..!
शरीरात कोणतीच सुंदरता नसते, सुंदर असतात ती त्या व्यक्तीची कर्मे, त्या व्यक्तीची विचारसरणी, त्या व्यक्तीची भाषा, त्या व्यक्तीची वागणूक, त्या व्यक्तीची कला, त्या व्यक्तीचे संस्कार, आणि त्या व्यक्तीचं चारित्र्य…! ज्या व्यक्तीच्या जीवनात या सर्व गोष्टी आहेत तीच व्यक्ती या जगातील सुंदर व्यक्ती आहे आणि अशा व्यक्तींचा पूर्ण जग आदर करतो.
एकदा माणूस देवाला म्हणाला “हे खुदा कितना अच्छा होता ४ चीजे होती, चार चीजे ना होती”,
“जिंदगी होती, मौत नही होती |
स्वर्ग होता, नर्क नही होता |
दौलत होती पर गरीबी ना होती|
सेहत होती पर बिमारी नही होती|”

उत्तर द्यायला देव प्रगट झाला आणि म्हणाला
“अगर मौत ना होती, तो मेरा दिदार ना होता?
अगर गम ना होता, तो मेरे हस्ती से कौन डरता?
जब गरिबी ना होती, तो मेरा शुक्रिया कौन अदा करता?
कोई बीमार ना होता, तो मुझे याद कौन करता?”

एके दिवशी दुःख आणि संपत्ती यांची भेट होते दुःख संपत्तीला म्हणते “तू किती नशीबवान आहेस प्रत्येक जण तुला मिळवायला प्रयत्न करत असतो आणि मी बदनसिब…. माझ्यापासून प्रत्येक जण लांबच राहायचा प्रयत्न करत असतो. “त्यावेळी संपत्ती दुःखाला म्हणते “खरं नशिबवान तर तू आहेस, तू लोकांच्या नशिबात असल्यावर लोक आपल्या माणसांची आठवण काढतात. फुटकं नशीब तर माझं आहे संपत्ती मिळाल्यावर लोक आपल्या माणसांना विसरून जातात”.
स्वामी म्हणतात “अहंकाराच्या वृक्षावर नेहमी विनाशाची फळे लागतात”.
जी व्यक्ती स्पष्ट साफ आणि सरळ बोलते, त्याची वाणी भाषा तीव्र आणि कठोर असते, परंतु अशी व्यक्ती कधीच कोणाला फसवत नाही. काहीही कारण असुद्या चिडू नका, रागावू नका, मोठ्या आवाजात बोलू नका, मन शांत ठेवा, विचार करा नंतर निर्णय घ्या. आवाजाने आवाज शांत होत नाही तर शांत राहिल्याने आवाज शांत होतो. त्रास तुम्हाला आणि दुःख पण तुम्हाला होणार मन शांत ठेवलात, तर सुख पण तुम्हालाच मिळणार..!
जिंकायचं काय असेल तर
‘प्रेम’ जिंका…
गिळून टाकायचं काय असेल तर ‘द्वेष’ गिळा…
विसरून जायचं असेल तर ‘दुःख’ विसरा…
द्यायचं काय असेल तर ‘दान’ द्या…
दाखवायचं काय असेल तर ‘दया’ दाखवा…
मिळवायचं काही असेल तर ‘ज्ञान’ मिळवा…
ठेवायचं काही असेल तर ‘इज्जत’ ठेवा…
फेकायचं काही असेल तर ‘दुश्मनी’ फेका…
शिकायचं काही असेल तर आपल्या माणसांवर ‘विश्वास’ ठेवायला शिका…
आणि
सांगायचं काही असेल तर ‘सत्य’ सांगा…
खूप वेळ आपण बोलतो ऐकतो दुनिया बदलली आहे. काय बदललय या दुनियेमध्ये…? मिरची अजून ही तिखटच आहे, मीठ अजूनही खारट च आहे, आंबा अजूनही गोडच आहे, माणसाचं जीवन अजूनही पाणीच आहे. अरे… बदलली आहे ती माणसा- माणसातली माणुसकी आणि दोष देतोय पुर्ण दुनियेला….! सत्य आणि विश्वास याशिवाय पूर्ण संसार व्यर्थ आहे. संसारात सर्व काही सत्यावर टिकून आहे. सत्याच्या तेजाने सूर्य जळतो, सत्यावर पृथ्वी चालतेय, सत्याच्या प्रभावाने हवा वाहतेय. प्रभु सांगतात सत्य हेच जीवन आहे.
नात्यातील कुलुपाला रागाच्या हातोड्याने नाही, तर प्रेमाच्या चावीने खोला..! कारण चावीने उघडलेले कुलुप परत कामी येतं आणि हातोड्याने तोडलेले पुन्हा वापरता येत नाही.
“जीवन कसं जगायचं हे भगवद गीता मध्ये शिकावं, जीवन कसे जगू नये हे महाभारत मध्ये शिकाव, जीवनात काय करावे हे रामायण मध्ये शिकाव.”
२१व्या शतकात आपण विज्ञानाच्या आधारावर खूप प्रगती केली आहे, पण अध्यात्माशिवाय जीवन अपूर्ण आहे. जाता जाता थोडे विचार मांडतोय. मी कोकणातला मराठी माणूस आहे काही चुकलं तर आपला समजून माफ करा हिंदी भाषेत लिहितो ,
“भगवान की अदालत मे वकालत नही होती और यदि सजा हो जाये तो जमानत नही होती |
हमेशा जोडने की कोशिश कीजिए तोडने की नही|
संसार मे सुई बन कर रहिये कैची बन कर नही|
सत्य की इच्छा होती हैं की सभी उसे जान ले असत्य को हमेशा भय रहता है कोई उसे पहचान ना ले |
घर की माँ को खुश रखो, मंदिर वाली माँ अपने आप खुश हो जायेगी|
एकदा एका माणसाला मी बोललो “दानधर्म करावा पुण्य मिळत”.त्यावर तो माणूस म्हणाला मनात फार असत दान धर्म करायचं पण वेळच नाही मिळत.”अरे मूर्ख माणसा… मेल्यावर मिळणार का वेळ तुला? संसाराच्या मोहात इतकाही अडकु नको की परमेश्वरासाठी वेळ नसेल.तुला माहिती असल पाहिजे आता जी वेळ तू भक्ती आणि सत्कर्म करण्यासाठी देशील तीच वेळ उद्या तुझ्या वेळेवर कामी येणार.”
देवा एक गोष्ट चांगली केलीस ती म्हणजे मरण माणसाला विचारून नाही देत तू,नाहीतर आम्ही स्वार्थी माणस या मरणाला पण बोललो असतो की आता वेळ नाहीय नंतर ये तू.

एन्जॉय परेरा

 

प्रतिक्रिया व्यक्त करा