You are currently viewing फक्त माझ्यासाठी..

फक्त माझ्यासाठी..

फक्त माझ्यासाठी

ती हसली…ती रडली सुद्धा,
तिने दुःखही भोगीले,
फक्त माझ्यासाठी.

ती रात्र रात्र जागली,
डोळ्यांतून दुःखाश्रू गाळत,
ती क्षण क्षण जगली.
फक्त माझ्यासाठी.

ती दूर दूर गेली,
असता सर्व सोबतीला,
माझ्याच आठवणीत रमली.
फक्त माझ्यासाठी.

ती शिकली… सवरली,
वाटलं तिला खूप शिकून,
एक उंची गाठावी.
फक्त माझ्यासाठी.

ती आजही हसते…खिदळते,
दुःखाश्रू लपवून ती,
आनंदाचा अनुभव देते.
फक्त माझ्यासाठी.

ती अजूनही जाणते…समजते,
मी तिचाच…अन ती माझी,
म्हणूनच मला हृदयात जपते.
फक्त माझ्यासाठी…
माझ्यावरचा प्रेमासाठी…!!

(दीपी)
दीपक पटेकर
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा