कुडाळ :
जिल्हा परिषद सिंधुदूर्ग, पंचायत समिती कुडाळ, सिंधुदुर्ग जिल्हा मधयवर्ती सहकारी बँक, स्नेहसिंधू कृषी पदवीधर संघ, भागिरथ प्रतिष्ठान ,”भारतीय किसान संघ “यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या गावठी आठवडा बाजार वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेले 7 ते 8 महिने बंद होता. तरी शेतकरी विक्रेत्यांनी सदर बाबींचा विचार करून पुन्हा एकदा रविवार दि. 14 नोव्हेंबर ला सुरू करत आहेत .
तसेच अती पाऊस , वादळ यामुळे विक्रेत्यांच्या स्टॉल चे नुकसान झाले होते,त्यामुळे शेतकरी विक्रेत्यांनी एकत्र येवून आपल्या स्टॉलची डागडुजी केली साफसफाई केली. गावठी बाजार पुन्हा सुरू होणार असल्याने, कुडळवसियांनी शेतातील ताज्या भाज्या तसेच विविध गावठी अन्नपदार्थ स्वस्त दरात खरेदी करणेची संधी मिळणार आहे.
तरी सर्वांनी गावठी बाजारातील वस्तू खरेदी करून विक्रेत्यांना प्रोत्साहित करावे जेणे करून प्रत्येकाला ताजी भाजी मिळेल. सर्वांनी स्टॉलला भेट देवून खरेदी करावी असे आवाहन शेतकरी विक्रेत्यांनी केले आहे .