जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य कवी दीपक पटेकर यांची रचना
सुख दुसऱ्याचं नजरेस पहावत नाही
दुःख मनाचं मनालाही सोसवत नाही
फुले वाहूनी केली नित्य भक्ती देवाची
अंतरी नसता भाव देव कुणा पावत नाही
बळे बळे करू नये ढोंग गरिबीचे कुणीही
फाटक्या खिशात पैशालाही राहवत नाही
सुखवस्तू घराणं मिळतं नशिबाने कुणा कुणा
सुखात समाधान मानण्या मन धजावत नाही
मातीच्या गंधा परिस महाग वास अत्तराचा
विकत घेतला सुवास श्वासाला भावत नाही
किती द्यावं प्रेम घेणारा सारं लुटूनी नेतो
लुटेऱ्याच्या मदतीस कुणीही धावत नाही
©[दिपी]✒️
दीपक पटेकर, सावंतवाडी
सिंधुदुर्ग ८४४६७४३१९६
सुंदर