You are currently viewing आवळेगाव श्री देवनारायण मंदिर वार्षिक जत्रोत्सव सोमवार 15 रोजी

आवळेगाव श्री देवनारायण मंदिर वार्षिक जत्रोत्सव सोमवार 15 रोजी

कडावल

दिवाळीची सांगता होताच कोकणातील वार्षिक जत्रोत्सवाना सुरुवात होते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात प्रथम म्हणून कुडाळ तालुक्यातील आवळेगाव येथील श्री देव नारायण मंदिर येथील वार्षिक जत्रोत्सवाने प्रारंभ होतो. आवळेगाव येथील श्री देवनारायण मंदिर येथील वार्षिक जत्रोत्सव कार्तिक महिन्यातील भागवत एकादशी ला ही पहिली जत्रा संपन्न होत असून दिनांक 14 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता श्री देव रवळनाथ मंदिर ते नारायण मंदिर पालखी सोहळा, सोमवार दिनांक 15 रोजी सकाळपासून ओटी भरणे कार्यक्रम, सकाळी 11 वाजता दत्त मंदिर ते नारायण मंदिर पर्यंत महिला नऊवारी साडी परिधान करून व वारकरी गणवेशात पुरुष मंडळी सहभागी होतात. ढोल-ताशांच्या गजरात ग्रामस्थांची पायी दिंडी रात्री अकरा वाजता पालखी सोहळा त्यानंतर खानविलकर दशावतार मंडळाचे नाटक होणार आहे आवळेगाव जत्रेचे वैशिष्ट्य म्हणजे नारायण मंदिराशेजारी विठ्ठल रखुमाई चे मंदिर आहे पंढरपूर यात्रा आणि आवळेगाव जत्रोत्सव असा हा दुग्धशर्करा योग समजला जातो आणि आणि जत्रेच्या दुसऱ्या दिवसापासून तुळशी विवाह प्रारंभ होतो. या जत्रेत तुळशी विवाह औचित्य साधून उसाच्या वादांची मोठ्या प्रमाणात विक्री होते पंदुर घोडगे मार्गावरील आवळेगाव पोलीस स्टेशन पासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर ही पहिली जत्रा होत असल्याने भाविकांची मोठी गर्दी असते यावेळी सर्व भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थान कमिटी व ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे. यावेळी  विविध धार्मिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा