You are currently viewing भाजपला जनतेच्या भावना समजल्या…

भाजपला जनतेच्या भावना समजल्या…

इंधन दर कमी करण्यावरून राष्ट्रवादीच्या पुंडलिक दळवी यांचा टोला

सावंतवाडी

केंद्र सरकारने पेट्रोल वर ५ तर डिझेल वर १० रुपये कमी केले आहेत. केंद्राने पेट्रोल डिझेलचे दर कमी करताच भाजपचे पदाधिकारी आता राज्य सरकारने देखील दर कमी करावेत अशी मागणी करत, केंद्र सरकार मुळे महागाई वाढली असल्याचे एकप्रकारे मान्य केले आहे. त्यामुळे उशिरा का होईना परंतु, भाजपला जनतेच्या भावना समजल्या असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी लगावला आहे. केंद्र सरकार सूडबुद्धीने जीएसटी परतावा देत नाही आहे. असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा