गेले पाच दिवस गोवा येथे राज्य विधानसभा गोवा आणि गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आणि एमआईटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रायोजित GOA@60 लोकशाहीचे साजरिकरण कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय महिला संसद, राष्ट्रीय युवा संसद आणि राष्ट्रीय पंचायत संसद पार पडली. या कार्यक्रमाच्या समारोपाच्या राष्ट्रीय पंचायत संसद कार्यक्रमात विषेश निमंत्रित म्हणून सिंधुदुर्गातील निवडक सरपंच सहभागी झाले आहेत.
यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री मान.प्रमोद सावंत, गोवा विधासभा अध्यक्ष मान.राजेश पेडणेकर, मंत्री मान.विश्वजीत राणे तसेच एमआईटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे संस्थापक अध्यक्ष मान.राहूल कराड, गोवा राज्याचे सर्व मंत्री महोदय आणि आमदार तसेच देशभरातील सुमारे 500 निमंत्रित सरपंच सहभागी झाले होते…
यावेळी एमआईटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट महाराष्ट्र सरपंच संसदचे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वक संतोष राणे, जिल्हा संघटक डॉ.राजू भंडारी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पणदूर सरपंच दादा साईल, तिरवडे सरपंच विहंग गावडे, वाघेरी संतोष राणे, असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, करंजे सरपंच मंगेश तळगावकर, हडपीड सरपंच दाजी राणे हे विशेष निमंत्रित म्हणून सहभागी झाले होते.