You are currently viewing गोवेरी येथे आढळला ब्लॅक पँथर..

गोवेरी येथे आढळला ब्लॅक पँथर..

सिंधुदुर्गात ब्लॅक पँथरचा पहिलाच रेस्क्यू

गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास कुडाळ तालुक्यातील गोवेरी येथील श्री. तुकाराम राऊळ यांच्या आंबा-काजू बागेच्या सिंचनासाठी बांधलेल्या ८ फूट खोल पाण्याच्या टाकीमध्ये काळा बिबट्या (ब्लॅक पँथर) पडल्याची माहिती वनविभागास मिळाल्या नंतर वनविभागाचे बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर बचाव पथकाने ८ फूट खोल टाकीमध्ये पिंजरा सोडत ग्रामस्थांच्या मदतीने त्याला पिंजऱ्यात घेत सुखरुप बाहेर काढण्यात आले. भक्ष्याच्या मागे धावत असताना तो विहिरीत पडला असावा असे वनविभागाच्या वतीने सांगण्यात आले. जिल्ह्यात ब्लॅक पँथरचे हे पहिलेच रेस्क्यू ऑपरेशन आज गुरुवारी वनविभागाकडून करण्यात आल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी अमृत शिंदे यानी दिली.

सदर बिबट्या हा नर जातीचा असून अंदाजे दीड ते दोन वर्षे वयाचा आहे. पशु वैद्यकीय अधिकारी यांचेकडून त्याची वैद्यकीय तपासणी करून त्यास नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.

यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. अमृत शिंदे म्हणाले, काळा बिबट्या हा अत्यंत दुर्मिळ बिबट्याची प्रजाती असून जनुकीय बदलांमुळे त्याचा रंग काळा होत असतो. जिल्ह्यात ब्लॅक पँथर चा हा पहिलाच रेस्क्यू आहे. बिबट्या हा निशाचर असून बहुतांशी भक्ष्याच्या शोधात तो रात्री बाहेर पडतो. बिबट्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये आढळनारे प्राणी जसे बेडूक, उंदीर, घुशी, ससे, साळींदर, घोरपड, पक्षी, माकडे यांपासून ते लहान आकाराची हरणे यांवरती ते उपजीविका करतात. बिबट्या हा अन्नसाखळीच्या सर्वोच्च स्थानी असून परिसंस्थेचा समतोल राखण्यासाठी महत्वाचा घटक आहे. काळा बिबट्या हा अत्यंत दुर्मिळ बिबट्या असून त्याचे निसर्गातील वास्तव्य हे जिल्ह्यातील जंगलाचे परिपुर्णतेचे सकारात्मक प्रतिक आहे.

कोणताही वन्यप्राणी जखमी अथवा अडकलेल्या स्थितीत आढळून आल्यास तात्काळ वनविभागास माहिती द्यावी अस आवाहनही करणेत आले.

सदर बचावकार्य उपवनसंरक्षक (प्रा.) सावंतवाडी श्री. शहाजी नारनवर व सहाय्यक वनसंरक्षक (खाकुतो व वन्यजीव) सावंतवाडी श्री. आय. डी. जालगावकर यांचे मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी, कुडाळ श्री. अमृत शिंदे, वनपाल नेरूर त हवेली धुळु कोळेकर, वनपाल मठ अ. स. चव्हाण,वनपाल मालवण श्रीकृष्ण परीट वनरक्षक नेरूर त हवेली सावळा कांबळे, वनरक्षक मठ सुर्यकांत सावंत, वाहनचालक राहुल मयेकर यांनी स्थानिक ग्रामस्थ दत्ताराम गावडे, सुशांत गावडे, बाळू खानोलकर, विश्वजित खानोलकर, अनंत राऊळ, ओंकार जाधव, सतीश गावडे यांच्या मदतीने यशस्वी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा