– जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष व प्रवक्ता इर्शाद शेख
वेंगुर्ला
डिझेल व पेट्रोलवर प्रचंड अबकारी कर गेल्या सात वर्षात वाढवून भाजपच्या केंद्र सरकारने देशातील जनतेला प्रचंड लुटले आहे. मनमोहन सिंग सरकार सत्तेवर असताना 2014 पर्यंत पेट्रोलवर अबकारी कर 9.48 रुपये होता आणि डिझेलवर 3.56 रुपये होता. गेल्या सात वर्षामध्ये हा कर वाढवून नरेंद्र मोदींच्या केंद्र सरकारने पेट्रोलवर 32.90 रुपये आणि डिझेलवर 31.80 रुपये केला तो अबकारी पुन्हा मनमोहन सिंग सरकारच्या काळात लावण्यात आलेल्या करा एवढा करावा यासाठी भाजपने आंदोलन करावे. राज्य सरकारचा कर म्हणजे व्हॅट (व्हॅल्यू अॅडेड टॅक्स) केंद्र सरकारने अबकारी कर कमी केल्यास राज्य सरकारचा कर आपोआप कमी होतो जसा डिझेलवर दहा रुपये कमी केल्यावर जवळपास डिझेलवर बारा रुपये कमी झाले म्हणजे आताच्या डिझेल व पेट्रोलच्या कमी झालेल्या दरात राज्य सरकारचा वाटा आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने आमची अशी मागणी आहे कि भाजपच्या केंद्र सरकारने मनमोहन सिंग सरकारच्या काळातील अबकारी कर लावावा त्यामुळे राज्य सरकारचा सुद्धा व्हॅट कमी होऊन जनतेला पेट्रोल साधारणपणे 70 रुपये प्रति लिटर व डिझेल 60 रुपये प्रति लिटर मिळू शकेल. त्यामुळे भाजपने हे कर कमी करण्यासाठी मोदींच्या म्हणेजच भाजपच्या केंद्र सरकार विरोधात आंदोलन करावे अन्यथा सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून केंद्र सरकारच्या विरोधात जनआंदोलन उभारेल व भाजपचा ढोंगीपणा जनते समोर आणेल असा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष व प्रवक्ता इर्शाद शेख यांनी दिला आहे.