न्युझीलँडचा फायनल मधे प्रवेश, मिचेल सामनावीर
टी 20 च्या पहिल्या सेमीफायनल सामन्यामध्ये न्युझीलँड ने इंग्लंड वर ५ गडी राखून विजय मिळवला. न्युझीलँड ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि इंग्लंडला फलंदाजीला आमंत्रित केले. इंग्लंडची सुरुवात चांगली झाली. पण पाचव्या षटकात मिनले ने बेनस्ट्रोकला बाद करत इंग्लंडला पहिला धक्का दिला. त्यानंतर बटलर पण बाद झाला. २ गडी बाद झाल्याने इंग्लंड ची फलंदाजी अडचणीत आली.
पण त्यानंतर आलेल्या मलान, मोईन अली, लिविंगस्टोन ने तुफानी फटकेबाजी करत इंग्लंडचा डाव सावरला आणि १६६ धावांचा डोंगर उभा केला. मोईन अली ने २ षटकार आणि ३ चौकार च्या मदतीने ३७ चेंडूत ५१ धावांची अर्धशतकीय खेळी केली.तर मलान ३० चेंडूत ४१ धावा, लिविंगस्टोन१० चेंडूत १७ धावा केल्या. न्युझीलँड तर्फे नीशम, सोधी मिनले, साऊथी यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. इंग्लंडने न्युझीलँड समोर २० षटकात चार गडी गमावत १६७ धावांचे आव्हान ठेवले.
धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या न्यूजलंडची सुरवात लडखळत झाली. भरवशाचे फलंदाज गुप्तील आणि विलीयमसन स्वस्तात बाद झाले. त्यांना वोक्स ने बाद केले. त्यानंतर आलेल्या कोनवे आणि मिचेल च्या जोडीने संयमी खेळी करत डाव सावरला त्यांनी ३ ऱ्या गड्यासाठी ८२ धावांची भागीदारी केली. कोनवेने ३८ चेंडूत ४६ धावांची खेळी केली. त्यानंतर आलेला फिलिप्स २ धावा करत बाद झाला. त्यामुळे सामना पूर्णपणे इंग्लंड च्या बाजूने झुकला. पण अष्टपैलू नीशम ने जॉर्डन च्या १ षटकात तुफानी फटकेबाजी करत.
सामना न्युझीलँडच्या बाजूने झुकवला. त्याने ३ षटकार आणि १ चौकार च्या मदतीने ११ चेंडूत २७ धावा चोपल्या. पण रशीद ने नीशम ला बाद करत न्यूजलंडला मोठा धक्का दिला. पण सलामीला आलेल्या मिचेलने एकाकी झुंज देत हा सामना इंग्लंड च्या हातातून खेचून घेतला व आपल्या संघाला फायनल मधे प्रवेश करून देण्यास मोलाचं योगदान दिलं. त्याने४ षटकार आणि ४ चौकार च्यामदतीने ४७ चेंडूत ७२ धावा केल्या. त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आल. इंग्लंड तर्फे वोक्स आणि लिविंगस्टोन ने २ गडी बाद केले.