You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवनियुक्त प्रभारी विनायक देशमुख सिंधुदुर्गात

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवनियुक्त प्रभारी विनायक देशमुख सिंधुदुर्गात

कुडाळ येथे उद्या काँग्रेस मेळावा

कुडाळ

केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने कृत्रिमरीत्या महागाई वाढवून देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्किल झाले आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार या महागाई विरोधात आधुनिक भारताचे शिल्पकार भारताचे पहिले पंतप्रधान स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीदिना पासून म्हणजेच 14 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात जनजागरण अभियान राबविण्यात येणार आहे.
नियोजनासाठी *अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवनियुक्त प्रभारी विनायकराव देशमुख* हे गुरुवार दिनांक 11 नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचे MIDC रेस्टहाऊस कुडाळ येथे रात्री 8.00 वाजता स्वागत करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार दिनांक 12 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 9.30 वाजता जिल्हा काँग्रेसची सभा व पत्रकार परिषदचे आयोजन MIDC रेस्टहाऊस कुडाळ येथे करण्यात आले आहे. तरी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी व सदस्य, प्रांतिक सदस्य, सर्व तालुकाध्यक्ष, फ्रंटल विभाग व सेलचे जिल्हाध्यक्ष, लोकसभा व विधानसभा उमेदवार, नगरसेवक सर्व पदाधिकारी यांनी आपआपल्या कार्यकर्त्यांसह उपस्थितीत रहावे,असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा