You are currently viewing राज्यात चालू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला ऑल इंडिया धनगर समाज महासंघ कोकण प्रदेश च्या वतीने जाहीर पाठिंबा

राज्यात चालू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला ऑल इंडिया धनगर समाज महासंघ कोकण प्रदेश च्या वतीने जाहीर पाठिंबा

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास राज्य सरकारच्या विरोधात महासंघ रस्त्यावर उतरणार – कोकण प्रदेशाध्यक्ष नवलराज काळे यांनी दिला इशारा

सिंधुदुर्ग

महाराष्ट्र राज्यात एसटी कर्मचारी यांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन पुकारले असून अद्याप त्यांच्या कोणत्याही मागण्या मान्य केल्या नाहीत व सरकार त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक दिसत नाही. राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळण्याचे काम करत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार पुढाकार घेताना दिसत नाही. उलट आंदोलनात सहभागी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर ती कारवाई करण्याच्या धमक्या दिल्या जात आहे अशी शोकांतिका व्यक्त करत सरकार कडून चालू असलेल्या हुकूमशाहीच्या विरोधात एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने आपल्या मागण्या पूर्ण होण्यासाठी, झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी सध्या चालू असणाऱ्या आंदोलनास *ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली महाराष्ट्र राज्य कोकण प्रदेश* च्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. पाठिंबा देण्यासाठी महासंघाचे कोकण प्रदेशाध्यक्ष नवलराज काळे व सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अमोल जंगले,रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विजय गोरे,रायगड जिल्हा अध्यक्ष आनंदराव कचरे यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहिले. एसटी बस ही सर्वसामान्य लोकांची जीवनवाहिनी आहे गेले तीन दिवस ती बंद असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्वसामान्य जनतेला याचा नाहक त्रास होत आहे व या सर्व नाहक त्रास आला सर्वस्वी जबाबदार राज्यसरकार आहे. भारतीय संविधानाच्या आधारित असणाऱ्या लोकशाहीच्या मार्गाने एसटी कर्मचारी आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी संप करीत आहे, या संपाला आमचे पूर्ण समर्थन आहे. सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्या व जनतेला होणाऱ्या त्रासातून मुक्त करावे.
एसटी कर्मचाऱ्यांची मागणी राज्य सरकारने लवकरात लवकर मान्य करुन जनतेला होणाऱ्या त्रासापासून लवकरात लवकर मुक्त न केल्यास एसटी कर्मचाऱ्यांच्या समर्थनात ऑल इंडिया धनगर समाज महासंघ महाराष्ट्र राज्य कोकण प्रदेश रस्त्यावर उतरेल असा इशाराच महासंघाचे कोकण प्रदेशाध्यक्ष नवलराज काळे यांनी राज्य सरकारला दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा