जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य कवी दीपक पटेकर यांची भक्तीरचना
स्वामी हो कृपा करा मजवर
ध्यान हे मूर्त निर्गुण निराकार !!धृ!!
मुख कमलावरी तेजस्वी भाव
स्वामी रुपी उभे दत्त मज ठाव
कर्दळीवनी प्रगटला दत्त अवतार
ध्यान हे मूर्त …. !!१!!
संकटी स्वामी तुम्ही होसी माता
धावोनीया जाता तुमचे नाम घेता
भिऊ नकोस मुखी स्वामींचे उद्गार
ध्यान हे मूर्त…….!!२!!
स्मरणगामी तुम्ही हो सद्गुरू
न मागणे काही भक्तिभावे स्मरू
पंचप्राण घेऊनी आलो उघडा द्वार
ध्यान हे मूर्त……!!३!!
©[दिपी]✒️
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६