– प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे
तळेरे
धनगर समाजाला एस टी आरक्षण मिळेपर्यंत धनगर समाज जनजागृती अभियान महाराष्ट्र भर राबविण्यात येणार आहे असे प्रतिपादन ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रविण काकडे यांनी केले ते ऑल इंडिया धनगर समाज महासंघ मुंबई प्रदेश च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या धनगर समाज जनजागृती अभियान शुभारंभ व गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा या कार्यक्रमात बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्ष संपतराव शेंडगे होते . धनगर समाज एस टी आरक्षण जनजागृती अभियानाचा शुभारंभ मा प्रवीण काकडे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यांचे शुभ हस्ते करण्यात आला .या आभियानाची सुरुवात मुंबई चेंबूर घाटला येथून करण्यात आली असून हे आभियान संपुर्ण महाराष्ट्रात राबविले जाणार असून प्रत्येक वाडी वस्ती डोंगर दऱ्याखोऱ्यातील समाज बांधव याचे पर्यत जाणार. पुढे म्हणाले की धनगर समाजाला एस टी आरक्षण देण्याबाबत सर्वच राजकीय पक्षानी जाणुन बुजून वंचित ठेवले असून धनगर समाजाचा फक्त मतासाठीच वापर करण्यात आला असून धनगर समाजाला आरक्षण देण्यापासून रोखायचे काम राजकीय नेते मंडळींनी केले असून येणाऱ्या काळात सर्वच राजकीय पक्षाला धनगर समाज जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. धनगर समाजाने जागृत राहून एकसंघ पणे लढा देण्यासाठी युवकांनी एकत्र येऊन राजकीय पक्ष गट तट बाजूला ठेवून या जनजागृती अभियान मोहिमेत सहभागी होऊन.धनगर समाजाचा फक्त वापरा आणि फेका हीच निती राजकीय नेतेमंडळींनी वापरली असून धनगर समाजाने स्वार्थी राजकीय नेतेमंडळीपासुन सावध रहावे लागेल. धनगर समाजाची एस टी आरक्षण फक्त अंमलबजावणी करायची आहे तरीपण महाराष्ट्र शासन व केंद्र सरकार वेळकाढूपणाचे धोरण अंवलबत आहे म्हणून महाराष्ट्रातील धनगर समाज आक्रमक पणे लढा देईल. या कार्यक्रमास राज्य सचिव नयन सिद राज्य संघटनमंत्री दयानंद ताटे मुंबई प्रदेश अध्यक्ष सुभाषराव येळे मुंबई प्रदेश महिला अध्यक्ष कविता कोकरे मुंबई प्रदेश उपाध्यक्ष केशवराव कस्तुरे मुंबई प्रदेश महिला उपाध्यक्ष ललिता हराळे ठाणे जिल्हा अध्यक्ष दादासाहेब गोरड. रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष विजयराव गोरे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख तुकाराम कोकरे कोकण प्रदेशाध्यक्ष नवलराज काळे रायगड जिल्हा अध्यक्ष आनंदराव कचरे रायगड जिल्हा महिला अध्यक्ष अर्चना शिंदे सिंधुदुर्ग जिल्हा महिला अध्यक्ष शुभांगी शिंदे पालघर जिल्हाध्यक्ष महिला सारिका बोडेकर प्रदेश बापूसाहेब खरात कोकण सोशल मिडीया प्रमुख विजय यमकर सातारा जिल्हा सोशल अध्यक्ष सल्लागार उत्तमराव सातपुते संजय सातपुते दरयाबा कोळेकर गणेश शिंगाडे सातारा जिल्हा अध्यक्ष सागर डोबाळे जगन्नाथ काकडे सुभाषराव एडके शहाजीराव पाटील .प्रास्ताविक मुंबई प्रदेश अध्यक्ष सुभाषराव येळे यांनी केले आभार राज्य महासचिव नयन सिद यांनी मानले याप्रसंगी समाज बांधव व विद्यार्थी मोठय़ा प्रमाणात उपस्थित होते.