You are currently viewing सावंतवाडी-आंबोली मार्गाची दुरुस्ती करा, गतिरोधकांकडे फलक लावा – संजय लाड

सावंतवाडी-आंबोली मार्गाची दुरुस्ती करा, गतिरोधकांकडे फलक लावा – संजय लाड

सार्वजनिक बांधकामच्या उपविभागीय अभियंतांना निवेदन, उपोषणाचा इशारा…

सावंतवाडी

वेंगुर्ले-बेळगाव मार्गावर सावंतवाडी ते आंबोली पर्यंत मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करा, तसेच मार्गावर असलेल्या गतिरोधकांकडे फलक लावा, अशी मागणी माडखोल माजी सरपंच संजय लाड यांनी सार्वजनिक बांधकामच्या उपविभागीय अभियंतांकडे केली आहे. दरम्यान १० डिसेंबर पर्यंत कार्यवाही न झाल्यास परिसरातील ग्रामस्थांना घेऊन आपल्या कार्यालयासमोर उपोषण छेडू, असा इशाराही त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिला आहे. याबाबतचे निवेदन श्री. लाड यांनी प्रसिद्धीस दिले.

त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, वेंगुर्ले-बेळगाव मार्गावर सावंतवाडी ते आंबोली दरम्यान कारीवडे ,पेडवे वाडी, बुर्डीपूल, माडखोल सापळे स्टॉप, माडखोल बाजार, मेट वाडी, धवडकी, दाणोली व घाट आदी परिसरात मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून वाहने टाकावी लागत आहेत. प्रसंगी त्या ठिकाणी अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. तर यापूर्वी सुद्धा असे छोटे-मोठे अपघात या मार्गावर घडले आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने याची तात्काळ दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अन्यथा त्या ठिकाणी अपघात घडल्यास किँवा कोणतीही जीवित हानी झाल्यास त्याला अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल, दरम्यान दहा डिसेंबर पर्यंत या रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास आपल्या कार्यालयासमोर परिसरातील ग्रामस्थांना घेऊन उपोषण छेडू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

त्यांनी दिलेल्या निवेदनावर सुरेंद्रनाथ राऊळ, जॅकी डिसोजा, राजकुमार राऊळ, संतोष राऊळ, राजन राऊळ, आनंद राऊळ, सूर्यकांत राऊळ, सिद्धेश शिरसाट आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी स्वाक्षऱ्या दिल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा