You are currently viewing कणकवलीतील कर्फ्यू ला तिसऱ्या दिवशी सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद….

कणकवलीतील कर्फ्यू ला तिसऱ्या दिवशी सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद….

कणकवली

मंगळवार हा कणकवलीच्या आठवडा बाजाराचा दिवस असूनही व्यापारी व नागरिकांनी जनता कर्फ्युमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला.त्यामुळे कणकवलीत तिसऱ्या दिवशीही जनता कर्फ्युला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला आहे. जिल्हात सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण कणकवलीत सापडू लागल्याने हा संसर्ग रोखण्यासाठी जनतेनेच या जनता कर्फ्युत सहभाग घेतला आहे.या निर्णयामुळे कोरोना संसर्गाची साखळी निश्चितच तुटेल असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.


कणकवलीत तिसऱ्या दिवशी बाजारपेठेसह शहरातील सर्व दुकाने बंद आहेत. जनता कर्फ्युमध्ये सर्व व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शवला आहे. दुकाने बंद असल्यामुळे मुख्य बाजारपेठे,बॅंका, आचरा रोड व शहरातील रस्त्यावर शुकशुकाट दिसत आहे.रिक्षा देखील बंद आहेत. आवश्यकतेनुसार रुग्णांना काही खासगी रुग्णालये व मेडिसिन मेडिकल दुकाने चालू ठेवण्यात आली आहेत.तसेच कणकवली शहरालगतच्या कलमठ, वरवडे, वागदे, ओसरगाव, हळवल,जानवली,गावांसह तळेरे, खारेपाटण गावातही १०० % बंद यशस्वी झाला आहे.तेथील दुकाने व नागरिकही जनता कर्फ्युत उत्स्फूर्त पणे सहभागी झाली आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा