महाराष्ट्र राज्य मत्स्योद्योग महामंडळाचे माजी उपाध्यक्ष कुलदीप पेडणेकर यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. सिंधुदुर्गच्या विकासाची प्रामाणिक तळमळ असणारा सच्चा नेता गमावल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे कुलदीप पेडणेकर यांना आदरांजली वाहण्यासाठी गुरूवार २० ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वा. कणकवली मातोश्री मंगल कार्यालय येथे सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
सिंधुदुर्गच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असणार्या कुलदीप पेडणेकर यांचे नुकतेच निधन झाले. एका चांगल्या नेत्याला आपण गमावले आहे अशी भावना सिंधुदुर्गवासियांच्या मनामध्ये आहे. त्यांच्या विषयीच्या आठवणींना उजाळा देत राजकीय, सामाजिक कार्यातील त्यांच्या वाटचालीच्या आढाव्यातून कुलदीप पेडणेकर यांना आदरांजली वाहण्यात येणार आहे. तरी सर्व कुलदीप पेडणेकर प्रेमींनी या शोकसभेस उपस्थित रहावे असे आवाहन रूपेश जाधव, डॉ. अभिनंदन मालंडकर व राजेंद्र पावसकर यांनी केले आहे. शोकसभेला येताना कोरोना पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग, मास्क व सॅनिटायझरचा वापर असे सर्व नियम प्रत्येकाने पाळणे आवश्यक आहे असे आयोजकांच्यावतीने सांगण्यात आले.