You are currently viewing स्वामीराज प्रतिष्ठान आयोजित जिल्हास्तरीय किल्ले स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद

स्वामीराज प्रतिष्ठान आयोजित जिल्हास्तरीय किल्ले स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद

जिल्हाभरातील तब्बल २६ संघाचा सहभाग

कुडाळ:

कुडाळ येथे दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर स्वामीराज प्रतिष्ठान तर्फे जिल्हास्तरीय किल्ले स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते. याच वर्षी स्वामीराज प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली आहे आणि पदार्पणाच्या पहिल्या वर्षातच स्वामीराज प्रतिष्ठानतर्फे भरवल्या गेलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये जिल्हाभरातील तब्बल २६ संघानी सहभाग दर्शवला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी ” स्वराज जपायचे असेल तर मातीचे गडकिल्ले बांधण्याची संस्कृती जपणे गरजेचे आहे ” असे उद्गार स्वामीराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष संकेत राणे यांनी काढले. तसेच ” ह्या वर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गडकिल्ले स्पर्धांना मिळालेला उस्फुर्त प्रतिसाद हेच गडकिल्ले प्रेमींचे प्रतीक आहे. गडकिल्ले बांधले तरच इतिहास समजेल” असे उद्गार स्वामीराज प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष रोहन करमळकर यांनी काढले.
कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी स्वामीराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष संकेत राणे, उपाध्यक्ष रोहन करमळकर, सचिव विवेक राजमाने, खजिनदार भूषण मेस्त्री, सदस्य सुयश घाटकर, भूषण अणावकर, भूषण मेस्त्री, कुणाल घाटकर, विनोद निकम, अमोल निकम, सुरज खरात, यशवर्धन राणे आदि पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा