जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ कवी गझलाकार श्री अरविंदजी ढवळीकर यांची काव्यरचना
सांगायचे काय तुला तें बघ तसेच राहून गेले
कोजागिरीचे टिपुर चांदणे तसेच वाहून गेले
कल्पित भीती एक अंतरी तुझ्या नकाराची
मन हे वेडे कसे अचानक अबॊल राहून गेले
किती जागल्या रात्री नन्तर विरहाच्या अंधारी
निद्रेविण मन तुझेच शतदा स्वप्नही पाहून गेले
एकच उरली आशा हे क्षण कधीन संपून जावे
सहवासाच्या आठवणींचे ज्यात मी न्हाऊन गेले
सीमोल्लन्घन झाले साऱ्या व्यथा राहिल्या मागे
रुसव्यांवर विजयाचे सोने लज्जेतच वाटून गेले
दिव्या दिव्यांच्या नवलाईची आली दिवाळी दारी
ऐक सांगते तुझ्या अंगणी प्रीत ज्योत लावून गेले
अरविंद