शहरात घडलेल्या दुहेरी हत्याकांडाबाबत केली चर्चा
सावंतवाडी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून सावंतवाडी पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांची भेट घेण्यात आली. राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी उभाबाजार येथील २ वृद्ध महिलांचा खून प्रकरणाच्या तपासाबाबत पोलीस निरीक्षकांना विचारणा केली. खुन प्रकरणाला ७ दिवस उलटल्यानंतर देखील खुन्याच शोध न लागल्यानं पोलिस निरीक्षकांची भेट घेतली. तर दुहेरी हत्याकांडासह मळगाव खून प्रकरण, सबनिसवाडा खून प्रकरणातील खुन्यांचाही शोध घेत त्यांना कैद करण्याची मागणी केली. कोणत्याही प्रकारचा दबावाला बळी न पडता खुन्यांचा शोध घेत कठोर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून केली. यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, महिला जिल्हाध्यक्ष उद्योग व व्यापार दर्शना बाबर-देसाई, शहराध्यक्ष देवेंद्र टेंमकर, हिदायतुल्ला खान, याकुब शेख, बावतीस फर्नांडिस, जहिरा ख्वाजा, सावली पाटकर आदी उपस्थित होते.