You are currently viewing माजी नगरसेवक सुनिल बांदेकर यांचे  १५ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशीय उपोषण…

माजी नगरसेवक सुनिल बांदेकर यांचे  १५ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशीय उपोषण…

कुडाळ

माजी नगरसेवक सुनिल बांदेकर यांचे १५ नोव्हेंबर रोजी एक दिवशीय लाक्षणिक उपोषण करणार आहेत.अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून आज केली आहे.कुडाळ नगरपंचायत नगरोत्थाननिधी 2020-2021 मध्ये सार्वजनिक कामे वगळून शिवसेना नगरसेवकांनी सुचविलेली कामे मंजूर करण्यात आली.याबाबतचे पत्र यापूर्वी कार्यालयात 19/03/2021 सादर देखील केले होते. तसेच का प्रस्तावासाठी जागा मिळणेबाबत नगरपंचायतीने पैसे भरणा केलेले असून आजपर्यंत देणे व करारपत्र करणेस एम.आय.डी.सी. अधिकारी टाळाटाळ करीत आहेत.तसेच कुडाळ,मच्छीमार्केट ही जागा महाराष्ट्र शासनाची असून त्यास नगरपंचाचत जागा खरेदी करण्यासाठी जिल्हा नियोजनमधून निधी उपलब्ध करून झाला असून यासाठी देखील अधिकारी चालढकल करताना दिसत आहे त्यामुळे यासंदर्भात आवाज उठवण्यासाठी १५ नोव्हेंबरला माजी नगरसेवक सुनील बांदेकर जिल्हा नियोजन च्या मिटिंग दिवशीच एक दिवशीय लाक्षणिक उपोषण करणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × two =